शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी महिला मंडळाचे ‘आॅपरेशन वॉश आऊट’

By admin | Updated: June 28, 2015 02:39 IST

राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात गावठी दारूभट्ट्या नष्ट करण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे.

सेलू : राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात गावठी दारूभट्ट्या नष्ट करण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. यात सेलू पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत नसल्याने सुरगाव येथील महिलांनी स्वत: पुढाकार घेत दारूभट्ट्या नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. महिलांनी सुरू केलेल्या ‘आॅपरेशन वॉश आऊट’ मुळे दारूविक्रेत्यांमध्ये धडकी भरली आहे. सेलू तालुक्यातील सुरगाव येथे नागपूरच्या पोलिसांनी पोलीस वाहनातच दारू ढोसून दारूबंदीची लक्तरे वेशीवर टांगली. त्याच सुरगावात शनिवारी सकाळी ८ वाजतापासून क्रांती दारूबंदी महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दारू काढणाऱ्या व पिणाऱ्यांच्या विरोधात दंड थोपटले. गावात आधीच्या प्रकरणानंतर दारूबंदी महिला मंडळ स्थापन करण्यात आले. शिवाय गावात दवंडीद्वारे दारूविक्री व दारू काढणे बंद करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशा सचूना दिल्या होत्या. त्याची माहिती सेलू पोलिसांना देण्यात आली होती. महिला मंडळ स्थापन करण्यात ठाणेदार संतोष बाकल यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे महिला मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.शनिवारी सकाळपासून केलेल्या कारवाईत गावालगतच्या नदी काठावरील शेतातील खड्ड्यात गाडून ठेवलेले सडव्याचे ड्रम शोधून काढत फोडण्याचे सत्र दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. याबाबतची माहिती ठाणेदार संतोष बाकल यांना दूरध्वनीवरून देण्यात आली. त्यांनी लगेच पोलिसांना पाठवून घटनास्थळी पंचनामा केला. यात आशिष ताकसांडे व विलास मखरे यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. बाहेर निघालेला सडवा नष्ट करण्यात आला तर ज्या ठिकाणी सडवा जमिनीतून बाहेर येत नव्हता, तेथे रॉकेल टाकून तो जाळण्यात आला. सदर कारवाई जमादार बैस यांनी केली. या कारवाईत इतर दारूविक्रेते मात्र पसार झाले होते.मोहिमेत क्रांती दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष सुनीता मेश्राम, कुंदा कुबडे, शकुंतला वानखेडे, शेख सय्यद शहनाज, ताई मेश्राम, वच्छला राऊत, सुमित्रा कुबडे, लता जवादे, नलू सयाम, सवीता मेश्राम, शेवंता मसराम, सीता उईके यासह तरुणांनी सहभाग घेतला.(तालुका प्रतिनिधी)देशी-विदेशी दारूविक्रेत्यांवरही होणार कारवाईसेलू तालुक्यातील दारूबंदी महिला मंडळेही सक्रिय झाली असून दारू पकडण्याकरिता महिला सरसावल्या आहेत. सुरगाव येथे सकाळी आठ वाजतापासून दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबविण्यात आली. यानंतर देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांविरूद्धही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे दारूविक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. सेलू पोलिसांचेही दारूबंदी महिला मंडळांना सहकार्य मिळत असल्याचे कारवाईवरून दिसून येत आहे. हिंगणघाट येथे दारूभट्ट्या उद्ध्वस्तहिंगणघाट - येथील पोलिसांनी शुक्रवारी वडनेर, समुद्रपूर व हिंगणघाट येथे कारवाई करीत भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. यात २०० ड्रम सडवा नष्ट केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वा.घ. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जमादार बाबाराव कुबडे, भास्कर मुदगल, अमीत नाईक, सहायक पोलीस निरीक्षक नाईक, जिट्टावार, लिंगाळे यांनी कोल्ही, शिवणी येथील पारधी बेड्यावर केली. या कारवाईत एकूण पाच लाख रुपयांचा माल पकडून समुद्रपूर येथे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)