शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

सिलिंडरचा गोरखधंदा उघड

By admin | Updated: August 7, 2016 00:16 IST

कायद्याने बंदी असताना अल्लीपूर येथील दोन इसमांकडून घरी गॅस सिलिंडरचा साठा करून त्याचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अल्लीपूर येथे दोघांना अटक : २.३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त वर्धा : कायद्याने बंदी असताना अल्लीपूर येथील दोन इसमांकडून घरी गॅस सिलिंडरचा साठा करून त्याचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी कारवाई करीत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या दोघांकडून भरलेले व रिकामे सिलिंडर तसेच त्याची वाहतूक करण्याकरिता वापरत असलेले वाहन, असा एकूण १ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी केली. माधव ढगे रा. सदानंद वॉर्ड याला अटक करण्यात आली असून त्याचा सहकारी सागर भलमे रा. भवानी वॉर्ड हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात दोघांवर जीवनावश्यक वस्तु कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस सुत्रानुसार, अल्लीपूर येथे राहणारे माधव ढगे व त्यांचा साथीदार गजानन उर्फ सागर भलमे हे संगणमत करून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची साठवणूक करून अवैधरित्या ग्राहकांना चढ्या दरात विकून काळाबाजार करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे व त्यांच्या चमूने माहितीतील घरावर धाड घातली. यावेळी घरात लाल रंगाचे घरगुती वापराचे भरलेले नऊ सिलिंडर किंमत १५ हजार ३०० रुपये व सात रिकामे सिलिंडर किंमत ७ हजार रुपये असा एकूण २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल परवाना नसल्याने जप्त केला. यावेळी विचारणा केली असता हे सिलिंडर गजानन उर्फ सागर भलमे याने आणले असून काही त्याच्या घरी असल्याचे कळले. यावरून त्याच्या घराची झडती घेतली असता येथे एका मालवाहु गाडीमध्ये तीन भरलेले व घरात ११ रिकामे सिलिंडर मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी सिलिंडरसह एम.एच. २९ एम १३६८ क्रमांकाचे वाहन असा एकूण २ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत माधव ढगे व सागर भलमे या दोघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पराग पोटे यांच्या नेतृत्त्वात, सहायक पोलीस उपनिरीक्षक बारवाल, जमादार नरेंद्र डहाके, दिवाकर परीमल, आनंद भस्मे, अमर लाखे, चालक भुषण पुरी, मुकेश येल्ले यांनी केली.(प्रतिनिधी)