शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्रसन्नचित्त होऊन जगणे हेच आनंदी जगण्याचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:41 IST

प्रत्येक जीवाच्या ठायी सहजता येणे म्हणजेच खरा आनंद आहे. संसारी आणि पारमार्थिक जीवनाचे यश हे प्रसन्न चित्त होऊन सुहास्य वदनाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यातच आहे.

ठळक मुद्देदामोदर रामदासी : विवेकांनद केंद्राद्वारे कार्यशाळा उपक्रम

ऑनलाईन लोकमतवर्धा : प्रत्येक जीवाच्या ठायी सहजता येणे म्हणजेच खरा आनंद आहे. संसारी आणि पारमार्थिक जीवनाचे यश हे प्रसन्न चित्त होऊन सुहास्य वदनाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यातच आहे. जीवनात द्वैताकडून अद्वैतापर्यंतचा प्रवास हा मनाची प्रसन्नता, शांतभाव, मौन आणि भावशुद्धीतूनच पूर्ण केला जातो, असे सूत्र दामोदर रामदासी यांनी सांगितले.विवेकानंद केंद्र आणि स्वामी मुक्तानंद योग महाविद्यालयामार्फत ‘आनंदी जगण्याची कला आणि वेदांत’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेची सुरूवात दीप प्रज्वलन व पुष्पार्पण करून झाली. प्रार्थना व स्वागत गीत सादर करण्यात आले. अतिथी म्हणून म. गांधी हिंदी विद्यापीठाचे डॉ. अन्वर सिद्दीकी, प्रा.डॉ. शेषराव बावणकर, प्रमोद बोरकर, विनोद आगलेकर उपस्थित होते.रामदासी पूढे म्हणाले की, जीवनात कोणत्याही परिस्थितीत लवचिकता दीर्घकाळ टिकते. यामुळे उत्साह, प्रेम, प्रसन्नता यांच्या माध्यमातूनच लौकिक जीवन सहज आणि आनंदी करता येईल. सोबतच प्राप्त परिस्थिती व व्यक्तीचा आहे त्या स्थितीत स्वीकार करायला सुरुवात करावी, म्हणजे वाट्याला आलेले दु:खही दु:ख वाटणार नाही. आपल्या वृत्तीत हळूहळू सकारात्मक बदल घडवून आणले की जगात कोणत्याही परिस्थितीत द्वेष, हेवा, दु:ख स्पर्श करणार नाही. वेदांत हा सर्वात विद्रोही आणि पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यासाठी आधार आहे, हे वेदांताच्या अध्ययनातून स्पष्ट होते. म्हणूनच स्वामी विवेकानंद यांनी शिव भावे जीव सेवा या सूत्राचा स्वीकार केला. प्रेमाची व्यापक संकल्पना आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे देखील वेदांत विचारात आहेत, असा उल्लेख अभ्यासपूर्ण विवेचनात रामदासी यांनी केला. भगवतगीता हा केवळ धर्मग्रंथ न समजता मानवी मानसशास्त्र अध्ययनाचा प्रभावी आणि मार्गदर्शक ग्रंथ आहे. आनंद या शब्दाला विरूद्ध अर्थाचा शब्दच अस्तित्वात नाही. हेच आनंदाच्या अक्षयतेचे विशेष आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. जीवनाचा प्रवास हा उजेडातून उजेडाकडेच असावा, या सूचक सल्ल्याने कार्यशाळा पार पडली.प्रास्ताविक विनोद आगलेकर यांनी केले. प्रमोद बोरकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ सिद्दीकी यांनी याप्रसंगी समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. बावणकर यांनी शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन रामदासी यांचा केंद्रामार्फत सत्कार केला. कार्यशाळेच्या शेवटी शांतीपाठ घेण्यात आला.यावेळी विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते, स्वामी मुक्तानंद योग महा.चे विद्यार्थी, निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले तर आभार धर्मेंद्र पवार यांनी मानले. कार्यशाळेला विनोद आगलेकर, प्रमोद बोरकर, अनंत बोबडे, धर्मेंद्र पवार, आनंद मधुपवार, शुभम उमाटे व युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.