शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम, सुजाण होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:56 IST

वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो, जगातील महान व्यक्तिमत्व घडले ते वाचनामुळे घडलेले आहे, नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : जिल्ह्यातील २१ वाचनालयांना केले विविध ग्रंथांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो, जगातील महान व्यक्तिमत्व घडले ते वाचनामुळे घडलेले आहे, नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील २१ वाचनालयाला ५० हजार रुपये किमतीचे ग्रंथ वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभादरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, कोषागार अधिकारी सुरज बारापात्रे, सुधीर गवळी, हर्षबोधी, यु.पी. नाले, मधुकर रोडे उपस्थित होते. पुढे बोलताना खा. रामदास तडस म्हणाले की, आज माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती मिळत असली तरी प्राथमिक पातळीवर प्रत्येक गावात ग्रंथालय पाहिजे. आज देशात अनेक कुटुंबांना ग्रंथालये माहीत नाहीत, ग्रंथ माहीत नाहीत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. वाचनाने माणसाला शहाणपण येते, कारण तुमच्या जीवनाची चेतना टिकवून ठेवण्यासाठी माहिती, ज्ञान आणि स्वातंत्र्याची दृष्टी देणाऱ्या पुस्तकांनी जीवनाचे परिवर्तन होते, समृद्ध मराठीची वाचन चळवळ रुजवायची असेल, तर असंख्य पुस्तके असलेल्या ग्रंथालयांचे रूपांतर वाचनालयात व्हायला हवे, ज्ञानेश्वर, तुकाराम, कुसुमाग्रजांसारख्या अनंत साहित्यिकांनी मराठी भाषेची परंपरा समृद्ध ठेवली आहे. हा वारसा असाच प्रवाहित ठेवायचा असेल, तर वाचन संस्कृतीला पर्याय नाही, असेही ते म्हणाले. जनता वाचनालय तळेगाव, महात्मा गांधी वाचनालय कारंजा, मित्रमिलन सार्वजनिक वाचनालय नारा, प्रेरणा वाचनालय इसापूर, सार्वजनिक ग्रामपंचायत वाचनालय शिरपूर, संत गाडगेबाबा वाचनालय भिडी, मोतीलाल कपूर वाचनालय देवळी, समता ग्रामीण वाचनालय पळसगाव, कै. दाजीबा सेलूकर वाचनालय इंझापूर, विदर्भ ग्रामीण वाचनालय सावंगी (मेघे), ग्रामीण वाचनालय साईनगर, जय दुर्गा माता वाचनालय भूगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचनालय चितोडा, संत कबीर वाचनालय कुरझडी, स्वामी विवेकानंद ज्ञान मंदिर वाचनालय हिरापूर, सार्वजनिक वाचनालय सालोड, त्रिमूर्ती वाचनालय बोरगाव (मेघे), सिद्धार्थ वाचनालय आर्वी, सार्वजनिक ग्रामीण वाचनालय सेवाकुंज घुबगाव, अब्दुल हमीद वाचनालय वर्धा, शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय बोरगाव (मेघे) या वाचनालयाला पुस्तक दिले.