शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

९६ वर्षांपासून ‘त्या’ दोन गावांत एकच गणपती

By admin | Updated: September 10, 2016 00:34 IST

गणेशोत्सवात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना एकीकडे रूजत असताना वर्धा तालुक्यातील कुरझडी व जामठा या दोन गावांत

एक पाऊल पुढे : कुरझडी-जामठा गावात सलोखा राखणारा गणेशोत्सवगौरव देशमुख  वर्धागणेशोत्सवात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना एकीकडे रूजत असताना वर्धा तालुक्यातील कुरझडी व जामठा या दोन गावांत मात्र मागील ९६ वर्षांपासून एकाच गणपतीची प्रतिष्ठापना केली जात आहे. ग्रामीण भागात हा कुतुहलाचा विषय बनला असून एक पाऊल पूढे असलेला गणेशोत्सव आदर्शवत ठरत आहे.दिवसेंदिवस शहरासह गावांत गल्लोगल्ली गणेश मंडळांची स्थापना होऊ लागली आहे. यामुळे लोकांचा हा उत्सव सध्या प्रशासकीय यंत्रणेला डोळ्यात तेल घालून पार पाडावा लागत आहे. तंटे टाळून गावात एकोपा राहावा म्हणून ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रूजत आहे; पण वर्धा तालुक्यात तीन हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या कुरझडी व जामठा या दोन गावांनी गणेशोत्सवात एक पाऊल पुढे ठेवले आहे. दोन्ही गावांतील ग्रामस्थ हा उत्सव एकात्मतेचे दर्शन घडवित गुण्या गोविंदाने साजरा करतात. यात जगन्नाथ तळवेकर, तुकाराम तळवेकर, व्यंकटराव जाधव, पांडुबा चौधरी, आबाजी तळवेकर, जयराम तळवेकर, किसना माहेश्वरी, माधव बोकडे, माणिक तळवेकर, भानुदास चौधरी, गणपत जाधव, तानबाजी पांडे सहकार्य करीत आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी ते स्वत: लक्ष देतात. यावर्षी गावातील रस्त्यांवर वृक्ष लागवड करीत सामाजिक संदेश देणारे फलक लावण्यात आले आहे. गावातील ग्रामपंचायतीचे सहकार्य घेत दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. शिवाय विविध विषयावरील जनजागृतीचे उपक्रमही राबविले जात आहेत.