शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व उपसरपंच यांचे एक महिन्याचे मानधन कोरोना व्हायरस निर्मुलनासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:48 IST

वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचा पुढाकार.

 वर्धा:   सध्या कोरोना व्हायरस या आजारामुळे अवघ्या जगात  महामारीने थैमान घातले आहे. अशातच भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळेच वर्धा जिल्ह्यातील सर्व सरपंच व उपसरपंच यांनी देशाचे एक महिन्याचे मानधन कोरोना निर्मूलनासाठी देणार असल्याचे सरपंच संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत कळविले आहे.        शासन आणि प्रशासन मोठ्या प्रमाणावर कोरोना kovid-19 ला रोखण्याचा प्रयत्न करीत असतानाच न भूतो न भविष्यती असा नाइलाजास्तव लॉक डाऊन करण्याची परिस्थिती शासनावर आली आहे.  देशावर मोठा आर्थिक भार येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने सुद्धा वैयक्तिक मदतीचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून मदतीचा ओघ असतांनाच आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्हा सरपंच संघटनेने देखील पुढाकार घेऊन वर्धा जिल्ह्यातील सर्व सरपंच व उपसरपंच त्यांना प्राप्त होत असलेल्या एक महिन्याचे संपूर्ण मानधन कोरोना या आजाराच्या निर्मूलन कार्याकरिता देणार असल्याचे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांनीे सांगितले आहे.       वर्धा जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित एकही रुग्ण नाही अशी परिस्थिती असताना देखील. देशावर आलेलं संकट आपणा सर्वांच आहे हा उद्देश ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोबतच प्रत्येक गावातील सरपंच तथा उपसरपंच यांनी आपण आपले एक महिन्याचे मानधन देणार असल्या संबधी पत्र आपल्या गट विकास अधिकारी यांचेकडे द्यावे. असे आवाहन सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र  राऊत यांनी केले आहे.