शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात एक ठार; एक गंभीर

By admin | Updated: June 24, 2014 00:01 IST

जिल्ह्यात आज दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. कारंजा (घाडगे) तालुक्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर

कारंजा (घाडगे) व कामठी (खैरी) येथील घटनाकारंजा (घा.), वर्धा : जिल्ह्यात आज दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. कारंजा (घाडगे) तालुक्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर कामठी (खैरी) येथील अपघातात चिमुकली जखमी झाली. कारंजा येथील राष्ट्रीय महामार्गावरील चंदेवानी शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. हा अपघात सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास झाला. यात उकंड महादेव डोंगरे (५०) रा. येनगाव यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सुत्रांनुसार, येनगाव ग्रा.पं.चे शिपाई उकंड डोंगरे हे दुचाकी क्रमांक एम. एच. ३१ जे १६४२ ने चिखलीकडे जात असताना वाहन क्र. एमएच ३७ जी-४६७१ ने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दिनेश घारपुरे यांच्या तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी भादंवीच्या कलम २७९, ३०४ अ, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला.कामठी (खैरी) येथे घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या बालिकेला भरधाव दुचाकीने धडक दिली. यात मयूरी पुरके ही सात वर्षीय बालिका जखमी झाली. हा अपघात रविवारी सायंकाळी ७ वाजाताच्या सुमारास झाला. याबाबत मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गावातीलच विक्की देशमुख याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (शहर/स्थानिक प्रतिनिधी)