शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

चार अपघातांत एक ठार; सात जखमी

By admin | Updated: May 13, 2014 00:01 IST

जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातात एक जागीच ठार झाल तर सात जण जखमी झाले. यातील तीन अपघात सोमवारी झाले तर एक अपघात रविवारी सायंकाळी घडला.

वर्धा : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातात एक जागीच ठार झाल तर सात जण जखमी झाले. यातील तीन अपघात सोमवारी झाले तर एक अपघात रविवारी सायंकाळी घडला. सेलू येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली. तर याच मार्गावर सकाळी ८ वाजताच्या सुमारास भरधाव टिप्प्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघे गंभीर गंभीर जखमी झाले. वर्धेत कारने दुचाकीला तर सेलसूरा येथे उभ्या ट्रॅक्टरचे चाक दुरूस्त करताना चालकाला दुचाकीले दिलेल्या धडकेत पाच जण जखमी झाले.

केळझर येथे ट्रेलरने विरूद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या दोघात मामी आणि भाच्याचे नाते असल्याचे समोर आले. जखमींना सेवाग्राम रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपूर येथे हलविण्यात आले. हा अपघात सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सामाजिक वनीकरणच्या कार्यालयाजवळ घडला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीला ट्रेलरने जवळपास ५00 फुट फरफटत नेले. यामुळे दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. जखमींची नावे राजेश उमेशसिंग सागवान (३५) व शशिकला दिलीप बाराहाते (४५) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महाबळा येथील राजेश उमेशसिंग सागवान व त्याची मामी शशिकला दिलीप बाराहाते यांचा गावोगावी जाऊन कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे हे दोघे दुचाकी क्र. एम.एच. ३२, ३३२८ ने विक्रीच्या कपड्याचा गठ्ठा घेवून नागपूरच्या दिशेने निघाले. दरम्यान विरूद्ध दिशेने लोखंडी पोल घेवून येत असलेल्या ट्रेलर क्र. जी.जे.१0 एक्स ७७00 ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात राजेश सागवान व शशिकला बाराहाते हे गंभीर जखमी झाले. त्यांना सिंदी (रेल्वे) कडून वर्धेकडे जात असलेल्या रुग्णवाहिकेने सेवाग्रामला नेण्यात आले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातानंतर घटनास्थळावरून वाहनासह पळ काढणार्‍या ट्रेलरच्या चालकाला काही नागरिकांच्या मदतीने केळझर टोल नाक्यावर पकडण्यात आले. सद्या ट्रेलर व त्याचा चालक सेलू पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास सेलू पोलीस ठाण्याचे जमादार खरे व शिपाई जावेद करीत आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)

दुचाकीच्या धडकेत तिघे जखमी

वर्धा- सेलसूरा येथील शेतकी शाळेजवळ पंर झालेल्या ट्रॅक्टरचा टायर बदलवित असताना भरधाव दुचाकी चालकाने धडक दिली. यात तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी ६.३0 वाजताच्या सुमारास घडली. यात सचीन चंफत चावके याच्यासह आणखी दोघे जखमी झाले. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी ट्रॅक्टर चालक चावके यांच्या तक्रारीवरून दुचाकी चालक यादव याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.