शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

छेडखानीच्या वादात एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:47 IST

युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली. ही घटना नजीकच्या निरंकार कोटेक्स येथे घडली.

ठळक मुद्देएक अटकेत : तळेगाव नजीकच्या निरंकार कोटेक्स येथील घटना

ऑनलाईन लोकमततळेगाव (श्यामजीपंत) : युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली. ही घटना नजीकच्या निरंकार कोटेक्स येथे घडली. किसन भील्ल (२५) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरज नवलसिंग सोळंकी (२१) रा. बसला खपरा त. नेपाळ नगर, जिल्हा बुरहानपुर (मध्यप्रदेश) याला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड आली.पोलीस सुत्रानुसार, येथील निरंकार कोटेक्स येथे कामानिमित्त विविध भागातून मजूर येतात. यातच किसन भील्ल (२५) हा आपल्या परिवारासोबत कामानिमित्त आला होता. त्याच्या सोबत त्याचा चुलत भाऊ साहेब जहानसिंग भील्ल (२०) हा सुद्धा आला होता. तीन दिवसांपूर्वी मृतकाचा चुलत भाऊ हा सुरज सोळंकी याच्या बहिनीच्या खोलीत गेला होता. यावेळी सुरज व साहेब या दोघांत चांगलाच वाद झाला होता. हा वाद आपसी समझोत्याने निपटविण्यात आला होता.या घटनेचा वचपा काढण्याच्या गुरुवारी रात्री सुरज सोळंकी हा किसन भील्ल याचा चुलत भाऊ साहेब याला मारहाण करीत होता. हा वाद सोडविण्याकरिता किसन मध्यस्थी करण्याकरिता गेला होता. दरम्यान मध्यस्थी करण्यास आलेल्या किसनवर सुरजने चाकुने वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना अतीरक्तस्त्रावामुळे त्याचा वाटेतच त्याचा मृत्यू झाला.या घटनेची तक्रार पोलिसांत करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरजला अटक केली. या प्रकरणी ठाणेदार भोयर, उपनिरीक्षक राठोड, निलेश पेटकर, आशिष चव्हाण, सचिन साठे तपास करीत असून यात आणखी आरोपी आहेत काय, याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Murderखून