शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरातील पीक गारद

By admin | Updated: July 18, 2016 00:38 IST

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वत:च्या शेताला हात न लावता शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील धुरा फोडून नालीचे खोदकाम केले.

 धुऱ्यावर नालीचे खोदकाम : शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी आष्टी (शहीद) : पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वत:च्या शेताला हात न लावता शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील धुरा फोडून नालीचे खोदकाम केले. यामुळे शेतकऱ्याचे दीड एकरातील पीक पूर्ण उद्ध्वस्त झाले. नाली खोदणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचा आरोप बेलोरा (बुजरूक) येथील शेतकऱ्याने केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. बेलोरा येथील शेतकरी अंबादास जाणे यांची मौजा अहमदपूर साजा मध्ये ०.८१ आर (दोन एकर) शेती आहे. यावर्षी मोठ्या कष्टाने त्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली. अंबादास यांचे वय ७२ वर्षे असल्याने त्यांच्याकडून अधिक धावपळ होत नाही. यामुळे शेतातील समस्या दिवसागणिक वाढत आहेत. बेलोरा गावातील चिरकुट बोरवार आणि गुलाब घाटोळे या दोन्ही शेतकऱ्यांनी धुऱ्याच्या तोंडावर नाली खोदून माती टाकली. पावसामुळे माती वाहून गेल्याने पाणी साचले. शेतातील पीक उद्ध्वस्त झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेताच्या मधोमध असणारा धुराच पूर्ण खोदण्यात आला आहे. याबाबत दोन्ही शेतकऱ्यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न अंबादास यांनी केला; पण आमचेच बरोबर आहे म्हणत दोघांनीही मुजोरी कायम ठेवल्याचेच दिसते. यामुळे अंबादास यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे लेखी निवेदनातून न्याय देण्याची मागणी केली आहे. शेतात तलाव साचला असताना अद्याप तहसीलदार, तलाठी यापैकी कुणीही शेताला भेट दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. अंबादास यांच्यावर बँक तथा सावकाराचे कर्ज आहे. उत्पन्न झाले नाही तर कर्जाची परतफेड करणे त्यांना अवघड होणार आहे. पावसाचे पाणी दरवर्षी वाहून जाण्याचा मार्ग उपलब्ध असताना जाणीवपूर्वक नालीचे खोदकाम करून वेठीस धरण्याचा प्रयत्न दोन्ही शेतकरी करीत आहेत. परिणामी, आत्महत्या करण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा मार्ग नाही, असे म्हणत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तहसीलदार कार्यालयात गेल्यानंतर कुणीही अधिकारी त्यांची समस्या ऐकून घेत नसल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे आपल्याला न्याय मिळणार की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शेतकरीच शेतकऱ्याचा वैरी झाल्याने गंभीर समस्या उद्भवली आहे. पाणी वाहून गेले नाही तर खरीपाचे कुठलेही पीक घेता येणार नाही. वर्षभर कुटुंबाचे पालनपोषण करण्याचे साधन शेतीच असल्याने महसूल विभागाने त्यांना तात्काळ न्याय देणे गरजेचे झाले आहे. दीड एकर पीक उद्ध्वस्त करणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा मला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे. अंबादास जाणे यांनी शेतातील खोदकाम केलेल्या नालीबाबत प्रशासनाला सूचना देऊनही अद्याप कोणतीही शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी सरसावले नाही. महसूल विभागाचे अधिकारी यावर प्रतिक्रीया देण्यासही तयार नाहीत. मग, शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेतकऱ्याला न्याय मिळवू देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)