शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

बस अपघातात वृध्द महिला ठार

By admin | Updated: December 11, 2015 02:39 IST

येथील बसस्थानकावरील धावपळीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील ७५ वर्षीय महिला अचानक बसखाली येवून चिरडल्या गेली.

देवळी बसस्थानक परिसरातील घटनादेवळी : येथील बसस्थानकावरील धावपळीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील ७५ वर्षीय महिला अचानक बसखाली येवून चिरडल्या गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २.४५ वाजताच्या दरम्यान घडली. कलावती रामकृष्ण मारोटकर असे मृतकाचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार, यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावच्या तीन महिला भिक्षा मागण्यांसाठी म्हणून सोनेगाव (आबाजी) येथील यात्रेत आल्या होत्या. या परिसरात भिक्षा मागण्याची त्यांची ही पहिली वेळ होती. यात्रेत एक दिवसाचा मुक्काम करून त्या परतीच्या प्रवासासाठी देवळीच्या स्थानकावर आल्या. याच दरम्यान उदगीर-नागपूर बस क्र. एमएच ४०, वाय ५८७१ ही गाडी स्थानकावर येवून उभी राहिली. पुढील प्रवासासाठी चालकाने ही गाडी सुरू करताच बस पकडण्याच्या लगबगीमध्ये यातील कलावती रामकृष्ण मारोटकर अचानक बसपुढे आली. यात ती चिरडल्या गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. या बसस्थानकावर जागेचा अभाव असल्यामुळे नेहमीच अपघाताचे प्रसंग उदभवत आहे. स्थानकावर रात्रीचे वेळेस कोणतीच व्यवस्था राहत नसल्यामुळे तसेच प्रशासन याबाबत गंभीर नसल्यामुळे प्रवाश्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गाडी चालक आर. वाटरखेडे याला अटक केली.(प्रतिनिधी)कारच्या धडकेत महिला जखमीवर्धा - रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत महिला गंभीररित्या जखमी झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रं. ७ वरील संताराम हॉटेल परिसरात ही घटना मंगळवारी घडली. शांताबाई आत्राम असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत नत्थूजी बेटी रा. जाम यांनी समुद्रपूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी महिलेला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. सदर महिला रस्ता ओलांडत असताना चंद्रपूरकडे जाणाऱ्या एम.एच.३४ ए.एम. ५१३१ क्रमांकाच्या कार चालकाने धडक दिली. यानंतर चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी कार चालकावर भादंविच्या कलम २७९, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.