शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या निविदांना नव्या दराने मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:53 IST

ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाद्वारे दरवर्षी निविदा काढल्या जातात.

ठळक मुद्देबांधकाम विभागातील प्रकार : देयके अडकल्याने ७४ कंत्राटदार कर्जबाजारी

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाद्वारे दरवर्षी निविदा काढल्या जातात. कंत्राटदार सातत्याने कामे घेऊन ती पूर्ण करीत होते; पण यंदा कामांना ग्रहण लागले. जीएसटीमुळे त्रस्त कंत्राटदारांनी दोन महिने संप केला. हा संप मिटला असून ई-निविदा निघाल्या; पण जुन्या अंदाजपत्रकांच्या निवीदांना नवीन दर आकारले आहे. देयके अडकल्याने ७४ कंत्राटदार कर्जबाजारी आहे. आता नवीन दरांनी कामे कशी करावीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील वर्षभरापासून विविध कामांची देयके अडकली आहेत. यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशी बांधकाम विभागाच्या कार्यालयात कंत्राटदारांना प्रतीक्षा करावी लागली. अधिकारीही वरिष्ठांमुळे हतबल असल्याचेच दिसून आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ही वस्तूस्थिती कथन केली. कंत्राटदारांची गाºहाणी शाश्वत सत्य आहे, असे ते म्हणाले. यावर्षी खड्डे दुरूस्ती कामाच्या निवीदा दोन वर्षे देखभाल दुरूस्ती तत्वावर निघाल्या. यावर्षी बुजविलेले खड्डे पूढील वर्षी उखडले तर मोफत दुरूस्त करून द्यावे लागणार आहेत. या निवीदांमध्ये गतवर्षीचे दर समाविष्ठ आहे. आता नवीन दर प्राप्त झालेत. यात २५ टक्के दर कमी करण्यात आले आहेत. त्यातच १२ टक्के जीएसटी, असे एकूण ३७ टक्के दर कमी झालेत. अशा स्थितीत कंत्राटदार काय काम करतील व त्याचा दर्जा काय राहणार, हा प्रश्नच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाबाबतचे शासन निर्णय दररोज बदलत असल्याने कंत्राटदारही त्रस्त झाले आहेत.जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी वर्धा व आर्वी विभागाने ई-निविदा काढल्या. यात दरामध्ये प्रचंड तफावत आढळून येत आहे. परिणामी, वाढीव दर मागणार नाही, असे लिहून देण्यासाठी अधिकारी कंत्राटदारांवर दबाव टाकत आहे. यामुळे काम जुन्या दराने स्वीकृत करणे बंधनकारक असताना अधिकारी वरिष्ठांचे आदेश पाळावपे लागतात, असे सांगत आहेत. कागदी घोडे नाचविण्याच्या तालात प्रत्यक्ष खड्डे दुरूस्ती कामाला हरताळ फासला जात आहे. पावसाळा संपला. रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले. एकेका खड्ड्यात २०० फुटपर्यंत अनेक ठिकाणी खडी व मुरूमाची गरज आहे. आर्वी-पुलगाव, आर्वी-वर्धा, हिंगणघाट-वर्धा, खरांगणा-कोंढाळी, सुकळीबाई-बांगडापूर, तळेगाव-आष्टी-साहूर, आर्वी-तळेगाव, आर्वी-देऊरवाडा, वायफड, पुलगाव-वर्धा, वर्धा-सेलू, वर्धा-देवळी, वर्धा-सेवाग्राम-वर्धा या रस्त्यांची चाळणी झाली आहे. अपघाताची मालिका सुरूच आहे. सामान्यांना बांधकाम विभागाच्या भांडणाशी देणेघेणे नसते; पण त्रास त्यांनाच सहन करावा लागतो. यामुळे अधिकाºयांनी कंत्राटदारांचे प्रश्न सोडवून रस्त्याच्या दुरूस्तीची कामे मार्गी लावावी, ही अपेक्षा जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.आधी जुने बिल द्या, मगचं नवीन कामेशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन नियमांबाबत कंत्राटदारांची मते जाणून घेतली असता कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर मिटकरी यांनी मुख्य अभियंता नागपूर, अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांनी थकित देयके दिवाळीपर्यंत देऊ, अशी ग्वाही दिली होती. कंत्राटदार बांधकाम विभागात ठिय्या मांडून होते; पण सायंकाळपर्यंत निधी आला नाही. यामुळे ७४ कंत्राटदारांना निराश होऊन परतावे लागले. अशी फसवणूक आजपर्यंत झाली नव्हती. यामुळे आधी जुने बिल द्या व मग, नवीन कामे करू, अशी भूमिका घेतली आहे.आठ कोटींची देयके प्रलंबित२०१६-१७ मधील रस्ता डागडुजी कामांची आठ कोटींची देयके प्रलंबित आहे. कर्जबाजारी होऊन कंत्राटदारांनी व्याजाने पैसे घेत कामे केली. शासनाने वेळेत देयके अदा करणे गरजेचे होते; पण २०१७-१८ च्या नवीन कामांसाठी २५ टक्के निधी मंजूर केला. जुन्या देयकांना मात्र टाळाटाळ केली जात असल्याचे दिसते.शासनाने नवीन अंदाजपत्रक काढले. यात जुन्या दरांपेक्षा २५ टक्के कमी नवीन दर आहे. यामुळे नवीन दराप्रमाणेच निवीदा स्वीकाराव्या लागतील. शासनाकडून जुन्या कामांच्या देयकासाठी निधी आलेला नाही. ही बाब मंत्रालयीन सचिव स्तरावरील असून यात आम्ही काहीही करू शकत नाही.- दत्तात्रय भोंडे, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, आर्वी.