शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

१६ मंडळांकडेच अधिकृत वीज मीटर

By admin | Updated: September 11, 2016 00:36 IST

गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले होते; पण गणेश मंडळांनी महावितरणला ठेंगाच दाखविला आहे.

महावितरणलाच शॉक : अनधिकृत जोडण्यांवरच गणेशोत्सवातील रोषणाईप्रशांत हेलोंडे  वर्धागणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले होते; पण गणेश मंडळांनी महावितरणला ठेंगाच दाखविला आहे. जिल्ह्यात तब्बल २०४ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. असे असताना आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १६ गणेश मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे उर्वरित मंडळांचा गणेशोत्सव अनधिकृत वीज जोडणीवरच साजरा होताना दिसतो.वर्धा जिल्ह्यात २०४ सार्वजनिक गणेश मंडळे असल्याची नोंदणी पोलिसांकडे झाली आहे. या व्यतिरिक्त लहान-मोठे अनेक मंडळे आहेत. या मंडळांची नोंदणी झालेली नसल्याचेच दिसते. यामुळे गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी आणि देखावे लक्षात घेता अनधिकृत वीज जोडणी वेळप्रसंगी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. जिल्ह्यातील कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही मंडळांकडे कायम वीज जोडणी असण्याची शक्यता आहे. असे असले तरी अनेक गणेश मंडळांद्वारे जवळच्या महावितरणच्या खांबांवरून अनधिकृतपणे वीज जोडणी घेतली जात असल्याचेच दिसते. शिवाय गणेशोत्सवाचा कालावधी दहा दिवसांचा असतो. केवळ दहाच दिवसांसाठी कशाला अधिकृत वीज जोडणी घ्यायची, असा विचार करून अनेक गणेश मंडळे अनधिकृत वीज जोडणी घेत असल्याचेच दिसते. काहींनी मंडळातील सदस्य, परिसरातील व्यापारी, दुकाने, चक्की तसेच मिळेल तेथून तात्पूरती वीज जोडणी घेतल्याचे दिसते. महावितरणच्या वर्धा उपविभागात सर्वाधिक ११ तात्पूरत्या वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश जोडण्या वर्धा शहरातील असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंगणघाट उपविभागातील केवळ एकाच सार्वजनिक गणेश मंडळाने अधिकृत वीज जोडणी घेतली तर आर्वी विभागातील चार गणेश मंडळांना तात्पूरती जोडणी देण्यात आली आहे.अनधिकृत वीज जोडण्या घेतल्या जाऊ नये, कुणाच्या घर, दुकानातून वीज घेऊ नये वा विजेची चोरी होऊ नये म्हणून महावितरणने घरगुती वीज दरांपेक्षाही कमी दरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पूरती वीज जोडणी देऊ केली होती. या योजनेबाबत जिल्ह्यात बऱ्यापैकी जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला; पण गणेश मंडळांनी या योजनेला प्रतिसादच दिला नसल्याचे दिसून येत आहे. २०४ नोंदणी झालेल्या मंडळांपैकी केवळ १६ गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली. यामुळे अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर महावितरणकडून काय कार्यवाही केली जाते, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.कमी दरातील वीज पुरवठ्यालाही नकारचमहावितरणने धार्मिक उत्सवासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तात्पुरते मीटर बसविण्याचा खटाटोप करायलाही महावितरण तयार होते. जनजागृतीही केली. सार्वजनिक गणेश मंडळांना सूचनाही दिल्या; पण गणेश मंडळांना स्वस्तातील अधिकृत वीज जोडणी नकोच, असेच दिसते. शनिवारपर्यंत १६ मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतल्याने इतरांचे काय, हा प्रश्नच आहे. सर्वच मंडळांमध्ये रोषणाईजिल्ह्यात २०४ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झालेली आहे. यातील बहुतांश मंडळांनी आकर्षक रोषणाई केली तर काहींनी विजेची बचत करीत कमी विद्युत व्यवस्था ठेवली. असे असले तरी त्यांना विजेची गरज पडत आहे. मग, त्यांनी अधिकृत वीज जोडणी का घेतली नाही, हा प्रश्नच आहे.कार्यवाहीकडे सर्वांचे लक्षअनधिकृत वीज जोडणी घेताना धोका होण्याची शक्यताच अधिक असते. कुठे वायरचा तर कुठे मीटर वा खांबावर धोका होण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले होते; पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता महावितरण अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांवर काय कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकारी अभियंता सदावर्ते यांना विचारणा केली असता अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांवर कार्यवाही केली जात आहे, असे सांगितले.