शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

पंचायत राज समितीच्या दौऱ्याने अधिकारी, कर्मचारी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:44 IST

राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांची पाहणी, तपासणी करणार आहे.

ठळक मुद्देआज होणार जिल्ह्यात दाखल : विविध कार्यालयांची पाहणी करीत जाणून घेणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांची पाहणी, तपासणी करणार आहे. बुधवार ८ रोजी सकाळी १० वाजता ही समिती जिल्ह्यात दाखल होणार असून काही कामचुकार अधिकारी यामुळे धास्तावलेच आहेत.जिल्ह्यातील विधीमंडळाच्या सदस्यांशी विश्रामगृहात अनौपचारिक चर्चा ते करणार आहेत. त्यानंतर १०.३० ते ११ वाजता दरम्यान जि.प.च्या पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहे. सकाळी ११ वाजता सन २०१३-१४ लेखा परीक्षा पुनर्वविलोकन अहवालातील वर्धा जि.प.च्या संबंधी परिछेदसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. गुरुवार ९ आॅगस्टला समिती पंचायत समित्यांना भेट देणार आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, जि. प. प्राथमिक शाळा, ग्रा.पं., पं.स.च्या गटविकास अधिकारी यांची झाडाझडतीच ते घेणार आहेत. १० आॅगस्टला जि.प.च्या सन २०१४-१५ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात जि.प.च्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष होणार आहे. असे असले तरी वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक हे सध्या संपावर आहेत. समितीच्या दौऱ्याच्या दिवशी ग्रामीण भागात शासकीय कार्यालय बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे समिती काय भूमिका घेते याकडे कर्मचाºयांचे लक्ष आहे.दोन महिन्यांपासून तयारी सुरूविधीमंडळाच्या विधान परिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य या समितीत सहभागी आहेत. ते जिल्ह्याच्या कोणत्या भागात दौर करतात याविषयी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता मागील दीड ते दोन महिन्यांपासून या समितीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मागील महिन्यात या समितीचा दौरा निश्चित झाला होता. मात्र, नागपूर अधिवेशनामुळे तो बारगळला. आता या समितीच्या आगमनाविषयी उत्सुकता आहे.ग्रामपंचायतींची अस्वच्छता तपासाग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतींचे स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. सध्या केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवित असले तरी या पंचायत राज समितीने ग्रामीण भागातील स्वच्छतेचा दौऱ्याच्यानिमित्ताने आढावा घ्यावा, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती