शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाच्या वादात ७६० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:32 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसातबारा कोरा नसल्याने नव्या कर्जदाराची प्रतीक्षा : गत हंगामात झाले होते केवळ ४० टक्के कर्ज वितरण

रुपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवून ७६० कोटी रुपये करण्यात आले आहे. या व्याजाच्या वादाने यंदा कर्जवाटप प्रभावित होण्याची शक्यता आहे.गत खरीप हंगामात जिल्ह्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ७३० कोटी रुपये होते. याच काळात कर्जमाफीची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांनी कर्ज घेण्याकडे पाठ केली. परिणामी जिल्ह्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ ४० टक्क्यावर राहिले. या नव्या हंगामातही अशीच स्थिती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बँकेच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आहे त्यांना नवे कर्ज मिळणार आहे. तर सातबारावर कर्जाचा बोझा कायम असलेल्या शेतकऱ्यांना तर नियमानुसार कर्ज मिळणे शक्य नसल्न्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे व्याजाच्या रकमेबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.बँकांनी कर्जमाफीच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज आकारू नये अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. बँकांनी त्यांची ही घोषणा अमान्य करीत व्याज आकारणी कायम ठेवली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातबारा अध्याप कोरा झाला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नव्या कर्जातून व्याज कपातीचा जिल्हाधिकाºयांचा प्रस्तावमुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे बँकांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज वाढत गेले. जोपर्यंत शेतकरी ही रक्कम भरणार नाही तोपर्यंत सातबारा कोरा होणार नाही. आणि सातबारा कोरा झाल्याशिवाय बँका कर्ज देणार नाही अशी स्थिती असल्याने यावर मार्ग काढण्याकरिता वर्धेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नव्या कर्जातून जुन्या कर्जाच्या व्याजाची रक्कम कपात करावी असा प्रस्ताव ठेवला. यावर बँका सध्या चुप्पी साधून असल्याने दिसते. शिवाय शेतकरीही याबाबत शांत आहेत.शेतकऱ्यांकडून रक्कम भरण्याकडे दुर्लक्षकर्जमाफी झाल्यानंतर तिची रक्कम खात्यात जमा करण्याला विलंब झाला. यामुळे कर्जाच्या रकमेवर व्याज आकारण्यात आले. ही रक्कम माफ होण्याकडे शेतकºयांचे लक्ष आहे. यामुळे त्यांचे रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही रक्कम शासन देईल असे शेतकऱ्यांना वाटत आहे. तसे होण्याची शाश्वती नसल्याने सातबारा कोरा होणे सध्यातरी शक्य नसल्याचे दिसते.हंगाम तोंडावरखरीप हंगाम तोंडावर आला आहे. असे असताना व्याजाच्या रकमेचा घोळ कायम असल्याने कर्जमाफीनंतरही सातबारावर कर्जाचा बोझा कायम आहे. आता शेतकऱ्यांकडून नव्या कर्जाकरिता बँकेत जाणे आता सुरू होईल. यामुळे यावर वेळीच तोडगा काढणे गरजेचे आहे.