शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींची शिष्यवृत्ती अडली

By admin | Updated: July 11, 2017 01:01 IST

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणच नाही. केंद्रात केवळ दोन टक्के आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : महात्मा फुले समता परिषदेची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणच नाही. केंद्रात केवळ दोन टक्के आहे. ओबीसींची वेबसाईट बंद करून १४ लाख ओबीसी विद्यार्थ्यांची हक्काची शिष्यवृत्ती व शुल्क परतावा थांबविला. ओबीसींना गाजर दाखवून दिलेल्या स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला सहा महिन्यानंतर साधा चपराशी सुद्धा नाही. ओबीसी वरील अन्याय तत्काळ दूर करावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.मागणीचा विचार न झाल्यास भाजपच्या ओबीसी मंत्री, खासदार, आमदारांच्या निवासस्थानी ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी बँडबाजा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सध्याचे केंद्र व राज्यातील भाजपा सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले आहे. ओबीसींचे आरक्षण मागच्या दाराने रद्द करून, त्या जागा खुल्या प्रवर्गातील घटकांना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. भाजपाने निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण करून विविध आमिष देत सत्ता प्राप्त केली. परंतु, निवडणुकीनंतर सरकार ओबीसींचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार १००२ जागा या ओबीसींसाठी आरक्षित असायला पाहिजे. परंतु, देशभरात मेडिकल मधील प्रवेशासाठी केवळ ६८ जागा देवून केवळ १.८३ टक्के एवढेच ओबीसी आरक्षण ठेवून केंद्र सरकारने ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची खिल्ली उडवित असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढून ओबीसींवरील होणारा अन्याय दूर करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, निळकंठ पिसे, निळकंठ राऊत, भरत चौधरी, जयवंत भालेराव, अभय पुसदकर, संजय भगत, विनय वासेकर, वासुदेव ढुमणे, केशव तितरे आदी उपस्थित होते.