शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस बाधितांची संख्या पोहोचली १०७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

कोविड संकटाच्या काळात वाढते म्युकरमायकोसिसचे रुग्ण आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभोवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे व हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे असून आतापर्यंत जिल्ह्यात १०७ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. 

ठळक मुद्देतिघांचा घेतला बळी : ६५ रुग्णांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी सध्या जिल्ह्यात कासवगतीने का होईना पण म्युकरमायकोसिस हा आजार डोकेवर काढू पाहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०७ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी तिघांचा या बुरशीजन्य आजाराने बळी घेतला आहे. तर सध्या ६५ रुग्ण अंडर ट्रिटमेंट असल्याचे सांगण्यात आले.बुरशीजन्य संसर्ग असलेला म्युकरमायकोसिस हा प्रामुख्याने मधुमेह, वयोवृद्ध तसेच पूर्वीच विविध आजार असलेल्यांना होतो. रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी हा आजार जीवघेणा ठरणारा आहे. त्यामुळे कोविड संकटाच्या काळात वाढते म्युकरमायकोसिसचे रुग्ण आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभोवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे व हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे असून आतापर्यंत जिल्ह्यात १०७ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी तिघांचा जीवघेण्या या बुरशीजन्य आजाराने बळी घेतला असून ३९ रुग्णांनी त्यावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या ६५ रुग्णांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कोविडहिस्ट्री नाही तरी तिघांना म्युकरचा संसर्गजिल्ह्यात सापडलेल्या १०७ म्युकरमायकोसिस बाधितांपैकी १०३ रुग्णांची कोविड हिस्ट्री आहे. पण तीन रुग्णांची कोविड हिस्ट्री नसतानाही त्यांना या बुरशीजन्य आजाराची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोविड सोबतच म्युकरमायकोसिस बाबत प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या