शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची गरज असून यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाविषयीची माहिती गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी. सर्वेक्षण पथकाने शोधलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत अशा रुग्णांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवालानुसार पुढील प्रक्रिया करण्यात यावी.

ठळक मुद्देसंजीवकुमार : उपाययोजनांचा घेतला आढावा, लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने कोरोना तपासणी करण्याबाबत दिलेत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सर्दी, खोकला, ताप, वास व चव न समजणे, श्वास घेण्यास त्रास, डायरिया आणि एन्फ्लुएन्झा सारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घ्यावी, अधिकाधिक चाचण्या झाल्यास प्राथमिक अवस्थेत रुग्णांचा शोध लागून लवकर उपचार होतील आणि त्यांच्या माध्यमातून होणारा रोगाचा प्रसार थांबविता येईल, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी दिल्या.जिल्हा परिषद सभागृहात कोविड-१९ संदर्भात जिल्ह्यात राबविलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे उपस्थित होते.जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची गरज असून यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाविषयीची माहिती गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी. सर्वेक्षण पथकाने शोधलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत अशा रुग्णांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवालानुसार पुढील प्रक्रिया करण्यात यावी. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध प्राथमिक अवस्थेत होऊन त्यांच्यावर लवकर उपचार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. सर्वेक्षणाचा दररोज आढावा घेण्यात यावा. रोज गाव-वॉर्डनिहाय तपासण्यात आलेल्या रुग्णांची यादी करून त्यांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी. यासोबतच गावागावात हॅण्डवॉश स्टेशन तयार करावेत, तेथे पुढील तीन महिने हॅण्डवॉश मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर मास्कचा वापर न करणाºया व्यक्तींवर कारवाई करावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही आवश्यक असून त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्यात.या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, सर्व तहसीलदार, जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.कामगिरीबद्दल अधिकाऱ्यांना कौतुकाची थापवर्धा जिल्ह्याने कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. याबाबत त्यांचे कौतुक करून शाबासकी दिली. जिल्ह्याने आतापर्यंत केलेले काम उल्लेखनीय आहे. मात्र, आता यापुढे जिल्हाबंदी उठल्यानंतर, परिवहन सुरू झाल्यावर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यादृष्टीने तयारी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे संजीवकुमार म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या