शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता एका कॉलवर मतदारांना मिळेल माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:47 IST

मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० यावर संपर्क करून या केंद्रामध्ये संपर्क साधता येणार आहे.

ठळक मुद्दे१९५० टोल फ्री क्रमांक : जिल्हा संपर्क केंद्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० यावर संपर्क करून या केंद्रामध्ये संपर्क साधता येणार आहे.लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असून पूर्वतयारीने वेग घेतला आहे. या निवडणुकीबाबत नागरिक व मतदारांच्या मनामध्ये असणाऱ्या शंकांचे निरसन व्हावे, निवडणूक प्रणालीबाबत त्यांना माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हा निवडणूक शाखेमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल व उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये टोल फ्री क्रमांक १९५० वर फोन करून संपर्क करता येणार आहे. सुटीचा दिवस वगळून रोज कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये या केंद्रात संपर्क साधणे शक्य होणार आहे. तसेच प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हे केंद्र २४ तास सुरू ठेवले जाणार आहे. सध्या ही सुविधा केवळ लॅन्डलाईन क्रमांकावरून उपलब्ध करून दिली असून लवकरच मोबाईलवरूनसुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे.असा निवडला १९५० क्रमांकनिवडणूक विषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १०५० रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाची स्थापना झालेले वर्ष १९५० लक्षात घेऊनच निवडणूक प्रणालीबाबत माहिती देण्यासाठी १९५० क्रमांकाची निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: १९५० या कमांकावर संपर्क या सेवेचे उद्घाटन केले आहे.आगामी लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यात नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी व त्यांच्या मतदारयादी व निवडणूकविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने १९५० हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिक व मतदारांनी त्याचा लाभ घ्यावा.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.