शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारतोफांसह आता शक्ती प्रदर्शनाला येणार वेग

By admin | Updated: October 11, 2014 23:12 IST

विधानसभा निवडणुकीचे घोडा-मैदान आता जवळ आहे़ प्रचाराकरिता उमेदवारांकडे केवळ दोन दिवस शिल्लक राहिले असून आता शक्ती प्रदर्शनाची वेळ आली आहे़ यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी वेळ कमी मिळाला

प्रशांत हेलोंडे - वर्धाविधानसभा निवडणुकीचे घोडा-मैदान आता जवळ आहे़ प्रचाराकरिता उमेदवारांकडे केवळ दोन दिवस शिल्लक राहिले असून आता शक्ती प्रदर्शनाची वेळ आली आहे़ यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी वेळ कमी मिळाला तसेच युती-आघाडी झाली नाही, यामुळे जाहीर सभांतील शेरेबाजीही फारशी आढळली नाही़ असे असले तरी सर्वच उमेदवारांनी यथाशक्ती प्रयत्न करून प्रचाराची रणधुमाळी माजविली़ आता अंतिम टप्प्यातील प्रचार सुरू असून रविवार आणि सोमवार शक्ती प्रदर्शनाने गजबजणार आहे़यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आधीच ठरवून असल्याप्रमाणे २५ वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजपाची युती आणि काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी विस्कटल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार स्वतंत्रपणे लढत आहेत़ यात मतदारांची विभागणी होत असल्याचे दिसून येत आहे़ आघाडीची मते जी आजपर्यंत राष्ट्रवादी, काँगे्रसचे कार्यकर्ते संयुक्त उमेदवारासाठी मागत होते, ती आता आपल्या पक्षाला कशी मिळतील, यासाठी जोरकसपणे प्रयत्न होताना दिसून येत आहे़ यात कार्यकर्त्यांची पळवा-पळवी, पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे ओढणे, पैशाच्या बळावर प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न करणे यासह अन्य डावपेचही वापरले जात असल्याचे दिसून येत आहे़ हा संपूर्ण प्रकार मतदार मात्र केवळ बघ्याची भूमिका घेऊन पाहत असल्याचेच चित्र आहे़ यंदा उमेदवारांना निवडणूक प्रचाराकरिता केवळ १३ दिवसांचा कालावधी मिळाला़ या अल्प वेळेत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली़ इतके करूनही मतदारांची भेट होत नसल्याने होते नव्हते कार्यकर्ते कामाला लावले़ शिवाय भाडोत्री कार्यकर्त्यांची व्यवस्था करूनही प्रचाराची रणधुमाळी माजविली़ आता शेवटचे दोन दिवस असल्याने प्रचाराची धुमश्चक्री माजली आहे़ सर्वच उमेदवारांनी मिळेल ते कार्यकर्ते, मिळतील त्या वाहनांनी प्रचाराचे मैदान काबीज करण्याचा आटापिटा चालविला आहे़ जिल्ह्यातील चारही मतदार संघात उमेदवार ग्रामीण भागावर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे़ १५ आॅक्टोबरला मतदान होणार असल्याने दि़ १३ पर्यंत प्रचार करता येणार आहे़ केवळ दोनच दिवस असल्याने रविवारपासून उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन सुरू होणार आहे़ यात विलग झालेल्या चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार किती गर्दी खेचू शकतात, यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे़ असा ‘मॉब’ होता, या चर्चांनाही रविवारपासून उधान येणार असून याचा परिणाम बुधवारी जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ यामुळे सर्वच उमेदवार यावर भर देणार असल्याचे दिसते़