शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

आता नागरिकांना मिळणार १० लोकसेवा

By admin | Updated: September 4, 2015 02:06 IST

गत अनेक वर्षांपासून महसूल व वनविभागाकडे वनासंदर्भात अनेक समस्या प्रलंबित होत्या.

अधिसूचना जारी : महसूल व वनविभागाच्या सेवांमुळे नागरिकांना दिलासा वर्धा :गत अनेक वर्षांपासून महसूल व वनविभागाकडे वनासंदर्भात अनेक समस्या प्रलंबित होत्या. शेतकरी तथा नागरिकांनी भाजपा- शिवसेना युतीच्या शासनाकडे वनविभाग व महसूल विभागाने सेवा देण्याची मागणी केली होती. त्या मागणीवरून महसूलमंत्री एकनाथ खडसे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागातर्फे १० प्रकारच्या लोकसेवा देण्याचे निश्चित केले आहे. याबाबतची अधिसूचना जारी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना व वनविभागातून व्यवसाय करणाऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. वनविभागाच्या सेवा शेतकऱ्यांना तथा सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी शासनाचे सतत प्रयत्न सुरू आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांच्याकडे लोकप्रतिनिधींकडून सतत पाठपुरावा सुरू आहे. काही समस्या मार्गी लागलेल्या आहे, असे खा. रामदास तडस यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.(प्रतिनिधी)नागरिकांना मिळणाऱ्या सुविधायामध्ये १० लोकसेवामध्ये तेंदूपान कंत्राटदार व उत्पादक यांची नोंदणी दहा दिवसात उपवनसंरक्षक, प्रादेशिक यांच्याकडे केली जाईल. बांबु पुरविण्यासाठी नविन बुरड कामगारांची नोंदणी १५ दिवसात होईल. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची किंवा शेतकऱ्यांंचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मंजूर करण्याचा कालावधी १५ दिवस राहील. ही मदत वनपरिक्षेत्राचे प्रभारी सहायक वनसंरक्षकामार्फत मंजूर होईल. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी अथवा मृत झाल्यास १५ दिवसात आर्थिक सहाय्य मंजूर करण्याची हमी या कायद्यामध्ये आहे.वन्यजीव क्षेत्रात पर्यटन हंमागाम फोटोग्राफीसाठी १५ दिवसात परवानगी मिळणार आहे. वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरिता नुकसान भरपाई ३० दिवसात मंजूर होणार आहे. आरा मशीन धारकांच्या परवान्याचे नुतनीकरण महिनाभरात होईल. अनुसूचित जमातीच्या भोगवटदारांच्या मालकीच्या वृक्षतोडीसाठी ६० दिवसात परवानगी मिळणार आहे. गैरआदिवासी अर्जदारास वृक्षतोडीकरिता ६० दिवसातच परवानगी मिळणार असल्याची माहिती खा. तडस यांनी दिली. वर्धा लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.