शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

वैयक्तिक मान्यतेप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

By admin | Updated: February 15, 2016 02:11 IST

शासनाचे निकष डावलून खासगी संस्थांना शिक्षक भरती करण्यास मान्यता देण्यात आली. एवढेच नव्हे तर भरती करण्यात आलेल्या शिक्षकाला वैयक्तिक मान्यताही देण्यात आली.

शिक्षण आयुक्तांचे पत्र : शासनावर सात लाख रुपयांच्या भुर्दंडाचा आरोप वर्धा : शासनाचे निकष डावलून खासगी संस्थांना शिक्षक भरती करण्यास मान्यता देण्यात आली. एवढेच नव्हे तर भरती करण्यात आलेल्या शिक्षकाला वैयक्तिक मान्यताही देण्यात आली. याचा भुर्दंड शासनाच्या तिजोरीवर आल्याचा आरोप करीत येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे. शिवाय त्याचा खुलासा पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयात पाठविण्याचे उल्लेखित करण्यात आले आहे. या पत्रामुळे वर्धा जिल्हा परिषदेत शिक्षक भरती घोटाळा झाल्याचे संकेत मिळत आहेत.राज्यात आॅक्टोबर २०११ या काळात विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे पुर्णत: समायोजन झाल्याशिवाय नवी शिक्षक भरती करण्यात येणार नाही, असे आदेश मे २०१२ मध्ये निर्गमित करण्यात आले होते. असे असताना अनेक शिक्षण संस्थांकडून या आदेशाला डावलून शिक्षक भरती होत असल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे ६ सप्टेंबर २०१२ च्या निर्णयानुसार गणित, इंग्रजी व विज्ञान विषय शिक्षकांनी रिक्त पदे भरण्याबाबत निर्देश तसेच मुंबई विभागातील मुंबई व ठाणे जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश निर्गमित करण्यात आले. राज्यातील नव्याने शिक्षक भरतीवरील बंदी असताना सदर निर्देशातील नमूद अटींच्या अधीन राहून सूट देण्यात आली होती. शासन निर्देशातील अटीनुसारच नवीन शिक्षक भरती प्रस्तावावर निर्णय घेणे बंधनकारक होते; परंतु सन २०१२-१३ व त्यानंतरच्या वर्षात मान्यता प्रकरणी शासनाने घालून दिलेले निर्बंध व निकष डावलून अनियमितरित्या मान्यता देण्यात आल्याच्या अनेक तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्याचे काम कार्यवाहीत असताना सन २०१२ पूर्वी, सन २०१२-१३ व सन २०१३-१४ या वर्षांतील वेतन अनुदानाच्या थकबाकीची रक्कम अदा करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून २८ जानेवारी २०१५ नुसार शासनास प्रस्ताव सादर केला. वेतन अनुदानाच्या थकबाकीची चौकशी करण्यासाठी शासन निर्णय क्र. संकीर्ण २४१५/ (३४/१५)/अर्थसंकल्प, २४ जून २०१५ अन्वये निर्देश दिले होते. सदर शासन निर्णयानुसार आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने वेतन अनुदान थकबाकीची चौकशी प्रत्येक थकबाकीनिहाय करावी, असे निर्देश दिले होते.