शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

१,४७५ उमेदवारांना नोटीस

By admin | Updated: July 30, 2016 00:27 IST

जिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी विहीत कालावधीत निवडणुकीचा खर्च सादर केला नव्हता.

निवडणुकीचा खर्च दाखविलाच नाही : जिल्हा प्रशासनाकडून सुनावणी वर्धा : जिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी विहीत कालावधीत निवडणुकीचा खर्च सादर केला नव्हता. या विरोधात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील एकूण १ हजार ४७५ उमेदवारांना नोटीस बजावले. नोटीस मिळालेल्या उमेदवारांकरिता येथील विकास भवनात दोन दिवस सुनावणी आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी वर्धा, हिंगणघाट व समुद्रपूर या तालुक्यातील एकूण १२१ तर शुक्रवारी कारंजा (घाडगे), आष्टी (शहीद), देवळी, सेलू तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीमधील उमेदवारांनी येथे येऊन आपले म्हणणे सादर केले. यात ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी येत आपली कागदपत्रे सादर करून उत्तर सादर केले. ही कागदपत्रे तपासून आठ दिवसानंतर या प्रकरणात काय ती कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. सन २०१४-१५ मध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक निकालाच्या ३० दिवसांत त्यांचा खर्च संबधित विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास अशा उमेदवारांवर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील १४ (ख) (१) अन्वये अपात्र ठरविण्याची कारवाई करणे शक्य आहे. या नियमानुसार जिल्ह्यातील १ हजार ४७५ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नसल्याचे समोर आले आहे. अशा उमेदवारांना त्याचे म्हणणे सादर करण्याकरिता विकास भवनात गुरूवारी व शुक्रवारी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी या उमेदवारांचे म्हणणे ऐकून त्यांना त्यांचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या. या उमेदवारांनी सादर केलेल्या त्यांच्या म्हणण्यानुसार चौकशी करून त्यांच्यावर काय ती कारवाई करण्यात येणार आहे. यावर येत्या सात दिवसांत कार्यवाही करण्यात येणार असून यात १,४७५ पैकी किती उमेदवारांवर कारवाई होते व किती उमेदवार यातून बचावतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार १९ नोव्हेंबर २०१० नुसार ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रितीने सादर करणे आवश्यक आहे. असे न केल्यास अशा व्यक्तीला आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्याबाबत मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार कलम १४(ख)(१) मध्ये तरतुद करण्यात आली आहे.