शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘नोटा’ बदलवू शकतो अनेकांच्या मतांचा ‘कोटा’

By admin | Updated: October 9, 2014 23:05 IST

आठ तालुके मिळून असलेल्या चारही विधानसभा क्षेत्रात रिंगणात असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अंकगणितातून आपल्या मतांचा कोटा ठरविला आहे. हा कोटा ठरविताना मात्र त्यांना ‘नोटा’ (नकाराधिकार)चा विसर

रूपेश खैरी - वर्धाआठ तालुके मिळून असलेल्या चारही विधानसभा क्षेत्रात रिंगणात असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अंकगणितातून आपल्या मतांचा कोटा ठरविला आहे. हा कोटा ठरविताना मात्र त्यांना ‘नोटा’ (नकाराधिकार)चा विसर पडल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना त्यांची नाराजी व्यक्त करण्याकरिता असलेल्या नोटाचा वापर झाला होता. विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे याचा वापर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आघाडीत झालेली बिघाडी व युतीत झालेला काडीमोड यामुळे आतापर्यंत एकमत असलेले अनेक कार्यकर्ते दुखावले. अशात उमेदवारी देताना झालेली घाई व काही ठिकाणी झालेली बंडखोरी यामुळे पक्षाचे खंदे कार्यकर्ते नाराज झालेत. त्यांची नाराजी ते प्रचारातून दाखवित नसताना दिसून येत आहे. हा मतदार उमेदवारांना मते देतो वा नकाराधिकाराचा वापर करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे उमेदवारांकडून वर्तविली जाणारी भाकितेही बदलण्याची शक्यता आहे. सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारासह अनेकांनी रिंगणात उड्या घेतल्या आहेत. चारही मतदार संघातून एकूण ६९ उमेदवार रिंगणात आले आहेत. यात कधी राजकीय मित्र म्हणून सोबत बसणारे समोरासमोर आले आहेत. उमेदवारांच्या या भाऊगर्दीत मतदारही विचलीत होत आहे. शिवाय होत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रचारातून स्थानिक मुद्यांना तिलांजली देण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकाही उमेदवाराने स्थानिक विकासाकरिता काय करणार याचा कुठलाही खुलासा केला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे मतदारही विचारात पडला आहे.असाच प्रकार लोकसभेच्या निवडणुकीत झाला होता. यामुळे अनेक मतदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘नोटा’ या बटनाचा वापर करून आपली नाराजी दर्शविली होती. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात असलेल्या आठही तालुक्यात दोन हजार १९० मतदारांनी याचा वापर केला होता. यात आर्वी विधानसभा क्षेत्रात ४००, देवळीत ४७४, हिंगणघाट ५४३ तर वर्धेत सर्वाधिक ७७३ मतदारंनी नकाराधिकाराचा वापर केला होता. विधानसभा निवडणुकीतही या बटनाचा वापर करण्याची मुभा आहे. यामुळे त्याचा परिणाम कोणत्या विधानसभा क्षेत्रात अधिक होईल हे मतदानानंतरच कळेल.