शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

बंटीची आत्महत्या नसून हत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:12 IST

विनयभंग प्रकरणातील आरोपी बंटी उर्फ करण टेनपे यांनी आत्महत्या नसून गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी त्याची हत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी बोपापूर (दिघी) येथील ग्रामस्थांनी तसेच मृताच्या कुटुंबीयांनी देवळी पोलीस ठाण्यात रविवारी ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात ठिय्या : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : विनयभंग प्रकरणातील आरोपी बंटी उर्फ करण टेनपे यांनी आत्महत्या नसून गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी त्याची हत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी बोपापूर (दिघी) येथील ग्रामस्थांनी तसेच मृताच्या कुटुंबीयांनी देवळी पोलीस ठाण्यात रविवारी ठिय्या आंदोलन केले.गुरुवारी सायंकाळी बोपापूर (दिघी) येथील पीडिता बंटी दिलीप टेनपे यांच्या घराच्या आवारात सुकण्यासाठी गेलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. दरम्यान तिचा विनयभंग केल्याचा ठपका मृतक बंटी याच्यावर ठेवण्यात आला. शिवाय तशी तक्रारही देवळी पोलिसांत दाखल करण्यात आली. तर शुक्रवारी सकाळी बंटीचा मृतदेह गावाशेजारी आढळून आला. विनयभंगाचा आरोप असलेल्या बंटीने बदनामीपोटी आत्महत्या केल्याची चर्चा सध्या गावात होत आहे. परंतु, बंटीने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच करण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास गावाबाहेरून आलेल्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी ही हत्या केल्याचेही पुढे येण्याची शक्यता असल्याचा आवाज या आंदोलनाच्या माध्यमातून बुलंद करण्यात आला. बंटीच्या मारेकऱ्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप यावेळी मृताच्या कुटुंबीयांसह आंदोलनकर्त्यांनी केला. शिवाय, नारेबाजी करून या घटनेतील संशयित आरोपी सचिन मून, शीला लोखंडे, सचिनची आई आदींवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी आंदोलकर्त्यांची बाजू जाणून घेत योग्य कार्यवाहीचे आश्वास दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Murderखून