शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाअभावी अंमलबजावणी नाही

By admin | Updated: June 1, 2015 02:15 IST

दुष्काळग्रस्त भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उन्हाळी सुटीच्या दिवसातही पोषण आहाराची खिचडी शिजविण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले.

शासनाचे आदेश : दुष्काळग्रस्त भागातील शाळेत सुट्यांतही खिचडी शिजवा वर्धा : दुष्काळग्रस्त भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उन्हाळी सुटीच्या दिवसातही पोषण आहाराची खिचडी शिजविण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले. या आदेशानुसार जिल्ह्यात काम करण्याकरिता तांदूळच नसल्याने शिक्षकांची पंचाईत होत आहे. यामुळे शिक्षणमंत्र्यांचा हा निर्णय वर्धा जिल्ह्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पुणे येथील शिक्षण संचालकांच्या कार्यालयात संपर्क साधला आहे. तसा पत्रव्यवहारही झाला आहे. जिल्ह्यात पोषण आहाराच्या तांदळाचा दाणाही नसल्याने ही योजना कुचकामी ठरत असल्याचे पत्रातून कळविले आहे. यावर त्यांच्याकडून तांदूळ येण्यास आणखी आठ दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. योजना राबविण्याचा निर्णय घेत त्याच्या सूचना आल्या, मात्र आवश्यक साधनसामग्री आली नसल्याने निर्णय कागदोपत्रीच ठरत असल्याचे समोर येत आहे.जिल्ह्यात पाण्याने डोळे वटारल्याने दुष्काळ घोषित करण्यात आला. या बिकट परिस्थितीत ग्रामीण भागातील चिमुकल्यांना अन्नाविना राहण्याची वेळ येवू नये हा उदात्त हेतू ठेवत शिक्षणमंत्र्यांनी सुट्यांच्या दिवसातही शाळांत खिचडी शिजविण्याची योजना आखली. तसे पत्र प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. वर्धेच्या शिक्षण विभागाच्यावतीने आलेल्या पत्रानुसार प्रत्येक पंचायत समितीला आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्या; मात्र जिल्ह्यात तांदळाचा दाणा नसल्याने पत्राची अंमलबजावणी करण्यास अनेक अडचणी जात असल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. सुट्यांच्या काळात मुलेच शाळेत येत नसल्याने खिचडी कुणाकरिता शिजवावी असाही प्रश्न अनेक शाळांतील शिक्षक करीत आहेत. काही शाळात अहवालाच्या नावावर खिचडी शिजविण्याचा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. यात घोळ होण्याची शक्यता आहे. यामुळे शासनाची ही योजना जिल्ह्यात कुचकामी ठरत असल्याचे समोर येत आहे. हीच अवस्था राज्याचीही असल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या ३९४ शाळांत खिचडी शिजविण्याची सक्तीवर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३९४ शाळा आहेत. शासनाच्या शाळा असल्याने त्यांच्यावर दुष्काळाच्या काळात शाळेत खिचडी शिजविण्याची सक्ती आहेच. या सक्तीनुसार शिक्षक कार्यवाही करीत असले तरी त्यांच्याकडे तांदूळ उपलब्ध नसल्याने खिचडी कशाची शिजवावी या विवंचनेत ते आहेत. केवळ तादूळच नाही तर इतर साहित्याही त्यांना मिळाले नाही. यामुळे आणखीच पंचाईत होत आहे.जिल्हा परिषदेव्यतिरिक्त नगर परिषदेच्या ५४ शाळा आहेत. या व्यतिरिक्त खासगी शाळांचे मोठ जाळे आहे. या शाळांत मुलेच येत नसल्याने या आदेशाची अंमलबजावणी कशी करावी असा प्रश्न जिल्ह्यातील शिक्षकांना पडला आहे. जुना तांदूळही नाही शालेय पोषण आहरातील तांदळाचा एकही दाणा जिल्ह्यात शिल्लक नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. अशात नव्याने ही योजना राबविण्याच्या सूचना आल्या. त्यामुळे खिचडी शिजविण्याची नवी समस्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसमोर उभी आहे.अनेक शाळेत कागदोपत्री खिचडी शासनाच्या सूचना असल्याने त्याचा अहवाल सादर करावा लागणार हे स्पष्ट असल्याने बऱ्याच शिक्षकांनी त्यांच्या शाळेत खिचडी शिजविण्यात येत असल्याच्या नोंदी कागदावर घेणे सुरू केल्याची माहिती आहे. यामुळे येणाऱ्या तांदळात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. याची चौकशी गरजेची झाली आहे. पत्रव्यवहार होऊनही पुरवठा नाही सुट्यांच्या दिवसात खिचडी शिजविण्याच्या आदेशानुसार शिक्षण संचालक कार्यालयाला तांदूळ देण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे; मात्र त्यांच्याकडून अद्याप कुठलेही साहित्य आले नाही. यामुळे योजना राबविणे अडचणीचे जात असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.