शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

स्फोटके नव्हे, चायना मेड फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:04 IST

येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या एका पानटपरीच्याखाली स्फोटके पडून असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ती ताब्यात घेत पाहणी केली असता ते स्फोटके नाही तर दिवाळीत वापरण्यात येत असलेले चायनामेड अनार असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देशिवाजी चौक परिसरात भीती : पोलिसांनी केली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या एका पानटपरीच्याखाली स्फोटके पडून असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ती ताब्यात घेत पाहणी केली असता ते स्फोटके नाही तर दिवाळीत वापरण्यात येत असलेले चायनामेड अनार असल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला. हा प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.वर्धा शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या शिवाजी चौक परिसरातील एका पानटपरीच्या खाली डिटोनेटर सारखे दिसत असलेले स्फोटके दिसून आले. यामुळे या परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली असता ठाणेदार चंद्रकांत मदने आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बॉम्ब विरोधी पथकही दाखल झाले. त्यांनी ही स्फोटके ताब्यात घेत त्यांची तपासणी केली असता ते केवळ दिवाळीचे चायना मेड अनार असल्याचे समोर आले. हा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचाही जीव भांड्यात पडला. शिवाय शिवाजी चौक परिसरात भीतीही चायनामेडच ठरल्याची चर्चा होती.ते स्फोटके नाहीतशिवाजी चौक परिसरात आढळलेले ते कोणतेही स्फोटके नाही तर केवळ वापरलेले चायनामेड फटाके आहेत. त्यांना वायर वगैरे असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी ते ताब्यात घेत तपासणी केली असता ते दिवाळीचे चायनामेड फटाके असल्याचे दिसून आले.- चंद्रकांत मदने, ठाणेदार वर्धा.