शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उसेगावच्या तंटामुक्त व वनसंरक्षण समित्या नियमबाह्य

By admin | Updated: September 10, 2016 00:30 IST

समुद्रपूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत उसेगाव (पू) येथे तहकूब ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती व वनसंरक्षण समितीची निवड केली.

जि.प.कडे ग्रामस्थांची तक्रार : तहकूब सभेत समित्यांचे गठणवर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत उसेगाव (पू) येथे तहकूब ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती व वनसंरक्षण समितीची निवड केली. वास्तविक, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा व्हॉटस्अ‍ॅप आल्याचे सांगून या समित्यांचे नियमबाह्य गठण केल्याची तक्रारी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी संबंधितांवर कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली आहे.१५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ग्रामसभा बोलविण्यात आली होती. सभेच्या नियोजित वेळेच्या एक तासानंतरही कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. ही सभा २२ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता घेण्यात आली. सभेत नोटीसीप्रमाणे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, २०१६-१७ करीता म.ग्रा.रा.ग्रा. योजनेंतर्गत कामांची निवड करणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थी निवडणे आणि १४ व्या वित्त आयोगांतर्गत वार्षिक व पंचवार्षिक आराखडा तयार करणे, हे विषय ग्रामसभेने एकमताने पारित केले. यानंतर ग्रामसेवक प्रफूल्ल कांबळे, सरपंच अर्चना कन्नाके, उपसरपंच श्रीराम वगघने, सदस्य उद्धव दुरबूडे व सुनीता चौधरी यांनी ग्रामसेवकाच्या भ्रमणध्वनीवर जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांचा व्हॉट्सअ‍ॅप आल्याचे सांगून तंटामुक्त समिती व वनसंरक्षण समिती निवडीचा विषय ग्रामसभेत मांडला. या ठरावाला ग्रामसभेने विरोध केला. ही तहकूब सभा असल्याने आणि विषय सूचीवर हा विषय नसल्यामुळे तो घेऊ नये, अशी सूचना करण्यात आली; पण याकडे दुर्लक्ष करून सदर ठराव पारित केला. असे करण्यासाठी संमती देणारा शासनाचा आदेश दाखवा, अशी विचारणा ग्रामसभेने सचिव व सरपंचाला केली असता त्यांनी उलटसुलट उत्तर दिले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सदर समित्या बेकायदेशीर असल्याने त्या ग्राह्य धरु नये. पूर्वीच्याच समित्या कायम ठेवाव्या. नियमांचा भंग केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर फौजदारी कारवाई करून निलंबित करावे. सरपंच, उपसरपंच व त्या दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी ७६ जणांच्या स्वाक्षरीनिशी ग्रामस्थांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे तक्रारीतून केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)