नवीन वस्तू नाही : आय लव्ह यू कॅन्डल्स, लव्ह सर्टिफिकेट बाजारातश्रेया केने वर्धाप्रेमापुढे पैशाला किंमत नसते, असे म्हणतात. त्यामुळेच आपल्या ‘समवत स्पेशल’ गिफ्ट घेतानाही प्रेमवीर वस्तूंचा किंमतीचा विशेष विचार करीत नसल्याचे दिसते. कॉलेज गोर्इंगपासून ते विवाहित जोडप्यापर्यंत सगळेच ‘व्हॅलेन्टाईन डे’ साठी खरेदी करतात. मात्र नोटाबंदीमुळे बाजारपेठेत नाविण्यपूर्ण वस्तू दाखल पाहिजे त्या प्रमाणात झालेल्या नाही. चायनीज बनावटीच्या वस्तूंचा पुरवठा झाला नसल्याने यंदा ‘व्हॅलेन्टाईन डे’ची भेटवस्तूंची बाजारपेठ तशी मंदच असल्याचे पाहायला मिळते. व्हॅलेन्टाईन आता केवळ ‘डे’ पर्यंत मर्यादीत नसून तो संपूर्ण आठवडाभर साजरा केल्या जातो. त्यामुळे पाच-सहा दिवसांपासून ‘डे’ नुसार वस्तू खरेदी करण्यात येत आहे, अशी माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. प्रेमीयुगलांसाठी या दिवसाचे औचित्य मोठे असल्याने खास बनावटीच्या भेटवस्तू विक्रीकरिता बाजारपेठेत आल्या आहे. आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी विविध नात्यांना अनुसरून वस्तू विक्रीला आल्या आहे. स्क्रोल्स, सर्टिफीकेट, रंगबेरंगी आकर्षक बॅग्जचा यात समावेश आहे. तर प्रेमी युगलांसाठी आय लव्ह यू कॅन्डल्स, लव्ह सर्टिफिकेट, ग्रिटींग कार्ड, फिवर रोझ, हार्टशेप मग्ज, हम-तूम मग, रोझ झुंबर अशा वस्तू आहेत. या सर्व वस्तूंची किंमत २०० ते ८०० रूपयापर्यंत आहे. यातही लव मग्ज ला मागणी अधिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सध्या आठवडाभर चॉकलेट, रोझ आणि भेटवस्तूंची देवाण-घेवाण होत असल्याने त्यानुसार ग्राहक वर्गाचा प्रतिसाद असल्याचे रोहिणी पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.आॅनलाईनमुळे ‘व्हर्च्युअल गिफ्ट’ पाठविण्यावर भरबाजारात सध्या नाविण्यपूर्ण वस्तू कमी असल्या तरी व्हॅलेन्टाईन साजरा करण्याचा उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळते. बाजारपेठेत कपड्यांच्या दुकानात ‘लाल’ रंगाचे वस्त्र प्रावरण प्रदर्श् ानात ठेवले आहे. तसेच भेटवस्तूंचा दुकानात रेड पिलो, टेडीबिअर, रोझ, अशा सगळ्या वस्तू पाहायला मिळत आहे. सध्या आॅनलाईनचा ट्रेण्ड आल्याने ‘व्हर्च्युअल गिफ्ट’ पाठविण्यात भर दिला जातो. असे असले तरी भेटवस्तू विक्री-खरेदीचे प्रमाण आजही कमी झालेले नाही. स्क्रोल्स आणि कोटेशन कार्ड आणि स्क्रॅप बुकची यंदा मागणी अधिक असल्याचे समजते. आपल्या प्रियजनाला लिखित स्वरूपात भावना करण्याचा हा ‘फंडा’ हिट ठरत आहे.
‘व्हॅलेन्टाईनच्या’ बाजारपेठेवर नोटाबंदीचा प्रभाव
By admin | Updated: February 14, 2017 01:26 IST