शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न. प. विकास कामासाठी २५ कोटी दोन टप्प्यात देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:37 IST

पालिका विकास कामामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी विकास निधीचे कार्य केले आहे. येत्या काळात आर्वी न.प. विकास कामासाठी दोन टप्प्यामध्ये २५ कोटी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पालिकेच्या भवनाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पालिका विकास कामामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी विकास निधीचे कार्य केले आहे. येत्या काळात आर्वी न.प. विकास कामासाठी दोन टप्प्यामध्ये २५ कोटी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.आर्वी न.प. प्रशासकीय इमारीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. अनिल सोले, ना.गो. गाणार, अमर काळे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमित वानखेडे, माजी आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उपेंद्र कोठेकर, न. प. मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, माजी खासदार विजय मुडे आदींची उपस्थिती होती.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, आर्वी शहर व नगर परिषदेसाठी यापुढेही विशेष निधी देण्याची जबाबदारी माझी आहे. विदर्भात आर्वी नगरपालिका ही आदर्श ठरावी यासाठी सर्वांनी झटण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. नियोजन, वेग, प्रयत्न या त्रि-सुत्रीतून आर्वी पालिकेने या नव्या वास्तूचं जतन करावं, वर्धा जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना वित्तमंत्री म्हणून मी भरभरून मदत केल्याचेही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.आर्वी न. प. च्या इमारतीची प्रतिकृती ही विधानसभेसारखी असल्याने या वास्तूतून आर्वीच्या जनतेच्या समस्या निकाली काढत आर्वीचा चेहरा बदलण्यासाठी कार्य व्हावे, असे यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी केले. संचालन प्रा. नितीन बोडखे यांनी तर आभार मुख्याधिकारी अंधारे यांनी मानले. कार्यक्रमाला आर्वी शहरातील गणमान्य व्यक्तींसह उपस्थिती होती.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारRamdas Tadasरामदास तडस