शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गॅसही नाही अन् रॉकेलही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

रेशन दुकाने हा सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ, मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेतून सर्वसामान्यांना गॅस दिला जाणार होता. पण, तीन ते चार महिन्यांपासून हा गॅसही मिळालेला नाही.

ठळक मुद्देउज्ज्वला योजनेचा उद्देशच बाजूला : रेशनकार्डावरील रॉकेल देण्याची मागणी

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोरगरिबांच्या घरातील स्टोव्हसाठी रेशनकार्डावर मिळणारे रॉकेल बंदच झाल्याने त्यांचे हाल होत आहे. परिणामी, नागरिकांना पुन्हा चूल पेटविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर देण्याचे स्वप्न सरकारने दाखविले. पण, गॅस भरण्यासाठी पैसेच नसल्याने गरिबांना वर्षाला कसेबसे पाच ते सहा सिलिंडर वापरावे लागत आहे. त्यामुळे योजनेचा मुळ उद्देशच बाजूला पडला आहे. त्यामुळे गॅसही नाही, अन् रॉकेलही नाही, अशी अवस्था झाली आहे. केरोसीनमुक्तीच्या नादात वर्धा जिल्ह्यातील केरोसीनचा पुरवठा निम्म्याहून अधिक घटविण्यात आल्याने रेशनकार्डावरील रॉकेल पुन्हा देण्याची मागणी गरीबांकडून होत आहे.रेशन दुकाने हा सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ, मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेतून सर्वसामान्यांना गॅस दिला जाणार होता. पण, तीन ते चार महिन्यांपासून हा गॅसही मिळालेला नाही. उज्ज्वलाचा गॅसही नाही आणि हक्काचे मिळणारे अनुदानातील रॉकेलही नाही. शहरी भागातील दाट लोकवस्ती आणि झोपडपटी भागात सकाळी आंघोळीचे पाणी तापविणे, जेवण करणे यासाठी सर्रास पुन्हा चुलीचाच वापर केला जातो. किंवा स्टोव्हचा वापर केला जातो. पण, रॉकेल मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.२००९ पासून रॉकेल बंदरेशनकार्डावरील रॉकेल नियंत्रित दराने मिळत होते. प्रत्येक कुटुंबाला ५ ते २४ लिटरप्रमाणे संख्येनुसार रॉकेल मिळत होते. पण, २००९ पासून हे रॉकेल बंद केले आहे. १ गॅस सिलिंडर असणाऱ्यांनाही चार लिटर प्रतिमहिना प्रतिकार्ड रॉकेल दिले जात होते. पण, हे बंदच असल्याने नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहे.‘उज्ज्वला’मुळे ४८ हजार कुटुंबे गॅसधारकजिल्ह्यात उज्ज्वला योजना केंद्र सरकारच्या धोरणानुसार २०१६ मध्ये सुरू झाली. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांकडे मिळून जिल्ह्यात सुमारे ४८ हजार उज्ज्वला योजनेतील कनेक्शन आहेत. या ग्राहकांचा गॅस वापरण्याचे प्रमाण कमी आहे. हे ग्राहक गरीब कुटुंबातील असल्याने उज्ज्वलाचा गॅस ते पर्याय म्हणून वापरतात. त्यामुळे वर्षाला पाच ते सहा सिलिंडरच ते घेतात. त्यामुळे पुन्हा ते चूल अथवा स्टोव्हचा वापर करतात. उज्ज्वलाच्या नव्या गॅस जोडण्याही दोन वर्षांपासून बंद आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजना