शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ना आमरस, ना उसाचा रस, आहे केवळ ‘व्हायरस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

उन्हाळा सुरु झाला की, आंब्याचा रस, उसाचा रस, कोल्ड्रींक्स, ज्यूस, टरबूज, खरबुज, द्राक्ष अशा विशेष फळांची विक्रीची रेलचेल असते. लहाणांपासून तर मोठ्यापर्यंत या फळांचे आकर्षण प्रत्येकात असते. परंतु, विशेष करून यावर्षी कोरोना संसर्गाच्या उद्भवलेल्या संकटामुळे आंब्याचा रस आणि उसाच्या रसाची पाहिजे तशी चव चाखायला मिळणार नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देउन्हाचा पारा चढला : गावगाडे, चौकात चर्चा फक्त कोरोनाचीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्या. रविवारचे तापमान ४० डिग्रीच्यावर होते. आता उन्हाचा पारा चढता आहे. मात्र, अचानक ओढवलेले कोरोना संसर्गाचे संकट आणि खबरदारीसाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यावर्षी ना आमरस, ना उसाचा रस आहे फक्त व्हायरस आणि पारा चढला तरी चर्चा केवळ कोरोनाचीच दिसून येत आहे.उन्हाळा सुरु झाला की, आंब्याचा रस, उसाचा रस, कोल्ड्रींक्स, ज्यूस, टरबूज, खरबुज, द्राक्ष अशा विशेष फळांची विक्रीची रेलचेल असते. लहाणांपासून तर मोठ्यापर्यंत या फळांचे आकर्षण प्रत्येकात असते. परंतु, विशेष करून यावर्षी कोरोना संसर्गाच्या उद्भवलेल्या संकटामुळे आंब्याचा रस आणि उसाच्या रसाची पाहिजे तशी चव चाखायला मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. कारणा लॉकडाउन असल्यामुळे तशीही खाद्य पदार्थ आणि कोल्ड्रींक्स आणि ज्यूस सेंटर बंदच आहे. त्यामुळे बाजारपेठेत रसवंती, कोल्ड्रींक्स, ज्यूस सेंटरची दुकाने लावण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही. तर दुसरीकडे गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या मूसळधार पावसामुळे आंब्यासह अनेक पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत आंबा तसाही दिसेनासे झाला. आणि उन्हाचा पारा चढता जरी असला तरी चर्चा मात्र कोरोनाचीच असल्याने या लॉकडाउनमध्ये बच्चे कंपनीसह मोठ्यांना सुद्धा आंबा, उसाच्या रसाचा विसरच पडलेला दिसतो. कारण असे की, कोरोना संसर्गाच्या रुग्णांत हात असलेल्या वाढीमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात लॉकडाउन किती दिवस चालणार आणि घरखर्च कसा चालणार यासह अनेक प्रश्न घरातील कर्त्या माणासांसमोर उभे आहेत. अशात केवळ जगण्यासाठी आवश्यक वस्तूंवरच खर्च करताना अनेक जण दिसत आहे.पारा चढता; मात्र एसी, कुलर बंदचकोरोना संसर्गासाठी थंड वातावरण घातक असल्याचे म्हटले आहे. आणि दुसरीकडे कोरोना संसर्गाच्या खबरदारीसाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे यावर्षी कुलर विक्री, दुरुस्तीचे कामे पूर्णत: ठप्प झाली आहे. तसेच ज्यांच्याकडे एसी आहेत ते सुद्धा एसी बंद ठेवून उष्णतेत राहणे पसंत करत असून बरेचजण खिडक्या उघड्या ठेवून साध्या पंखयांच्या हवेत झोपणे पसंत करताना दिसून येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या