शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युनिक डिसेबल कार्डसाठी साडेपाच हजार दिव्यांगांची नोेंदणी

By admin | Updated: July 10, 2017 00:49 IST

दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच स्मार्ट कार्डच्या माध्यमातून मिळावा तसेच त्यांची नोंद केंद्रस्थानी ठेवत दिव्यांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

स्वावलंबन मेळावा : वर्धेसह सेलूतील शिबिराने समारोप; सर्वच शिबिरात उसळली गर्दीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच स्मार्ट कार्डच्या माध्यमातून मिळावा तसेच त्यांची नोंद केंद्रस्थानी ठेवत दिव्यांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी आयोजित शिबिरांचा रविवारी वर्धा व सेलू येथील शिबिराने समारोप झाला. देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्डकरिता जिल्ह्यात एकूण साडेपाच हजार दिव्यांगांनी नोंदणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून विविध तालुक्यात स्वावलंबन मेळावे झाले. आज आयोजित मेळाव्यादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आॅनलाईन व आॅफलाईन नोंदणीकरिता एकूण २० काऊंटर तर दिव्यांगांचा विमा उतरविण्याकरिता आठ टेबल लावले होते. सदर मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. अनुपम हिवलेकर यांच्यासह १५० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वर्धा व सेलूच्या मेळाव्यात अपेक्षेपेक्षा जास्त दिव्यांग आल्याने काही दिव्यांगांना त्रास सहन करावा लागला. अडीच हजार दिव्यांगांनी उतरविला दोन लाखांचा विमास्वावलंबन मेळाव्यात २ हजार ५०० दिव्यांगांनी आपला दोन लाखाचा विमा उतरविला. ३ ते ६५ वर्ष वयोगटातील दिव्यांगासह त्याच्या कुटुंबातील चार व्यक्तींना एक वर्षाकरिता या विम्याचे कवच देण्यात आले आहे. शिवाय दहा हजारपर्यंतच्या बाह्य रुग्ण सेवेचा लाभ मिळणार आहे. सावंगी (मेघे) येथील चमुने विमा उतरविण्याचे काम केले. जबलपूरच्या चमूकडून आॅनलाईन नोंदणीशिबिरात अलीमकोच्या जबलपूर येथील चमूने दिव्यांगांच्या अपंगत्वाची आॅनलाईन पद्धतीने नोंद घेतली. नोंद घेण्यात आलेल्या गरजूंना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार कृत्रिम अंग उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या चमूने जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५०० दिव्यांगांची नोंद केली.