शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निशीगंधा वाड होणार जि.प. शिक्षण विभागाच्या ‘सदिच्छादूत’

By admin | Updated: July 6, 2017 01:01 IST

अभिनयासह साहित्य व शिक्षण क्षेत्रातही रूची असलेल्या सिनेतारका निशीगंधा वाड यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेला भेट दिली.

जिल्हा परिषदेला दिली भेट : शिक्षणाच्या दर्जा वाढीबाबत चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अभिनयासह साहित्य व शिक्षण क्षेत्रातही रूची असलेल्या सिनेतारका निशीगंधा वाड यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेला भेट दिली. याप्रसंगी जि.प. शिक्षण विभागाच्या ‘सदिच्छादूत’ होण्यास त्यांनी होकार दर्शविला. शिवाय जि.प. शाळांच्या दर्जावाढीसाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करीत नाविण्यपूर्ण उपक्रमाचे कौतुकही केले. जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांची सिनेतारका निशीगंधा वाड यांच्याशी नागपूर येथे भेट झाली. त्यांनी जि.प. प्राथमिक शाळा तसेच तेथील शिक्षणाचा दर्जा वाढीसाठी काय करता येईल, असा प्रश्न त्यांना केला होता. शिवाय जिल्हा परिषदेला भेट देण्याचे सूचविले होते. यावरून वाड यांनी आज जिल्हा परिषदेला भेट दिली. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राथमिक शिक्षणाच्या दर्जा वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आली. यात जिल्ह्यातील ९२७ पैकी सुमारे ७०० शाळा डिजिटल झालेल्या आहेत. उर्वरित शाळाही डिजिटल करायच्या आहे. यासाठी कशी मदत मिळू शकेल, यावरही चर्चा केली. पालकांचे जि.प. शाळांकडे आकर्षण वाढावे, प्राथमिक शिक्षणात सुधारणेसाठी जि.प. शिक्षण विभागाच्या ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर’ व्हावे, असे त्यांना सूचविले. यावर त्यांनी होकार दर्शविला. यामुळे त्यांना जि.प. शिक्षण विभागाचे सदिच्छादूत करण्यावर विचार विनिमय करण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती व पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर यावर निर्णय घेणार असल्याचे जि.प. अध्यक्ष मडावी यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण उपक्रमाचे केले कौतुक वर्धा जिल्हा परिषदेद्वारे ग्रामीण भागातील महिला, मुलींकरिता सॅनिटरी नॅप्कीन पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे. याबाबत निशीगंधा वाड यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी नाविण्यपूर्ण योजना संबोधित कौतुक केले. ही योजना राज्यातील काहीच गावांत राबविली जाते. जिल्ह्याच्या सर्व गावांत ही योजना राबविणारी वर्धा जिल्हा परिषद एकमेव ठरणार आहे. हे नॅप्कीन ग्रामीण महिला, मुलींना केवळ पाच रुपयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचेही अध्यक्ष नितीन मडावी यांनी सांगितले.