शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्याचे कार्यालयातच ‘निद्रासन’

By admin | Updated: May 26, 2017 00:56 IST

शासकीय कार्यालये कामकाजासाठी की झोपण्यासाठी, हा प्रश्नच आहे. एक कर्मचारी शहरातील पशुधन विकास अधिकारी

कृत्रिम रेतन केंद्रात प्रकार : अधिकाऱ्यांचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय कार्यालये कामकाजासाठी की झोपण्यासाठी, हा प्रश्नच आहे. एक कर्मचारी शहरातील पशुधन विकास अधिकारी कार्यालयातच दुपारी ‘निद्रासन’ करीत असल्याचे दिसून आले. संबंधित अधिकाऱ्यांनाही यात काही गैर वाटत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भकास, पडक्या इमारती व घाणीच्या विळख्यात असलेल्या या कार्यालयात कामय कामे होतात, हाही प्रश्नच आहे. शासनाच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र हे कार्यालय जी.एस. कॉमर्स कॉलेजसमोर आहे. या कार्यालयात गुरूवारी दुपारी १ वाजता एक कर्मचारी कुलर सुरू करून झोप घेत असल्याचे दिसून आले. दार बंद, खिडक्यांना पडदे व गेट मात्र उघडे, अशी स्थिती होती. आतमध्ये डोकावून पाहिले असता एक कर्मचारी खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवत निद्रीस्त झाला होता. पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ. अमित पाटील, सहायक पशुधन विकास अधिकारी म्हणून एस.व्ही. आसुटकर, व्ही.ओ. चिकाटे तर परिचर म्हणून एच.के. यावले व यु.डी. उईके हे पाच कर्मचारी येथे कार्यरत आहे. या कार्यालयाचा परिसर भकास असून मागील भागात पडक्या इमारती आहे. केवळ भिंती उभ्या असल्याने शासन, प्रशासनाचे किती दुर्लक्ष आहे, हे दिसते. मागील काही वर्षांपासून या परिसरात दिवसभर गुरे फिरताना दिसतात. ही गुरे कुणी कृत्रिम रेतन केंद्रात आणलेली नसून ती मोकाट असतात. कधी बंद तर कधी सुरू राहणाऱ्या या कार्यालयावर कुणाचाही वचक नाही. कर्मचारी कार्यालयातच झोपा काढत असल्याने हा शासकीय निधीचा अपव्यय नव्हे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. कार्यालय दररोज उघडले जाते. सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत कामकाज होते. दुपारी कार्यालय बंद असते. एखादा कर्मचारी दुपारी तेथेच थांबला असेल म्हणून झोपला.- डॉ. अमित पाटील, पशुधन विकास अधिकारी, वर्धा.