शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

स्वच्छता अभियानात धाम नदीचे पात्र होणार निर्मळ

By admin | Updated: January 13, 2015 23:04 IST

येथील धाम नदीच्या पात्रात होत असलेल्या मूर्ती विसजर्नासह विविध कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. या घाणीमुळे नदीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. धाम नदीला विनोबा भावे

पवनार : येथील धाम नदीच्या पात्रात होत असलेल्या मूर्ती विसजर्नासह विविध कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. या घाणीमुळे नदीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. धाम नदीला विनोबा भावे यांच्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्या नदीची स्वच्छता करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. शिवाय त्याला जिल्हा प्रशानाकडून स्वच्छता अभियान जोडण्यात आले आहे. यामुळे बुधवारी सकाळी १० वाजता या स्वच्छता अभियानात जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह खासदर, आमदार व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. गावाच्या शेजारून वाहणारी धाम नदी जिल्ह्यात एक शुद्ध व पवित्र नदी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या नावारूनच आचार्य विनोबा भावे यांनी त्या परिसराला परमधाम असे नाव दिले. या नदीवर उत्तरक्रियेचे कार्य केले जाते, वर्धा शहराला पाणी पुरवठाही केला जातो, परिसरातील गुरे, ढोरेही आपली तृष्णा याच नदीच्या पाण्याने भागवीत असतात. अशा या पवित्र नदीचे अस्तीत्व मात्र आता धोक्यात आले आहे. निर्माल्यामुळे नदी प्रदुषित झालेली आहे. परिसरात जिकडे पहावे तिकडे कचराच कचरा विखूरलेला दिसतो.नदीचे पावित्र्य कायम राहावे हा विचार ग्रा.पं. प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे व गावकऱ्यांनीही त्याला पाठबळ दिल्यामुळे प्रशासनाने नदी व आश्रम परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. उद्या बुधवारी (दि.१४) सकाळी १० वाजता स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे. या मोहिमेमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्यासह नागरिक सहभागी होणार आहे.(वार्ताहर)