शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांवर नऊ भरारी पथकांचा ‘वॉच’

By admin | Updated: June 7, 2017 00:28 IST

जिल्ह्यात कृषी निविष्ठा गुणनियंत्रणाकरिता तसेच कृषी केंद्रावर नजर ठेवण्यासाठी नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

बाजारात बोगस बियाणे दाखल : शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात कृषी निविष्ठा गुणनियंत्रणाकरिता तसेच कृषी केंद्रावर नजर ठेवण्यासाठी नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. तसेच आठही तालुका स्तरावर प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. तक्रार निवारण समितीत बियाणे, खत व किटकनाशक यांचा होणारा काळाबाजार तसेच ज्यादा दराने विक्री, लिकिंग आदी तक्रारींचे निवारण करणार आहे. याकरिता टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला असून शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. जिल्हास्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक, वजनमापे निरीक्षक यांचा भरारी पथकात समावेश असून तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, वजनमापे निरीक्षक यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर असे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून शेतकऱ्यांना यासंदर्भात कोणत्याही तक्रारी असल्यास तक्रार नमूद करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर यांनी केले आहे. आर.आर. किंवा बी.जी.-३ नावाने बोगस बियाणे बाजारात महाशक्ती आर.आर. किवा बी.जी.-३ इत्यादी नावाने बियाणे येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवानी सावधानी बाळगण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. असे बियाणे कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात आलेले असते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्याचे कोणतेही देयक किवा परवाना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बोगस बियाण्यामुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही.