शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियन टोळीने घातला १४ लाखांनी गंडा

By admin | Updated: June 14, 2017 00:48 IST

दुर्धर आजारावरील औषधात उपयोगी असलेल्या अर्र्गानिया स्पिनोसा नामक बिया खरेदी करण्याची तयारी दाखवित....

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दुर्धर आजारावरील औषधात उपयोगी असलेल्या अर्र्गानिया स्पिनोसा नामक बिया खरेदी करण्याची तयारी दाखवित तळेगाव श्यामजीपंत येथील अरूण डाखोळे या पदवीधर युवकाला १४ लाखांनी गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी नायजेरियन टोळीतील तिघांना अटक केली आहे. हे तीनही आरोपी सध्या अमरावती पोलिसांच्या ताब्यात असून अमरावती येथील व्यापाऱ्यालाही या टोळीने ६० लाखांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे. माईक केवीन फिलीप उर्फ बोबो उर्फ कॉसमॉस आणि एमेको फेवर इफेसीना तसेच सुकेशनी उर्फ स्रेहा पांडूरंग दरेकर उर्फ आदिती शर्मा अशी अटकेत असलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटकेतील नेमक्या कोणी अरूण डाखोळे याच्याशी संपर्क साधला हे अद्याप उघड झाले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. अरगानिया स्पिनोसा जातीच्या या बिया दिल्लीतून विकत घ्याव्यात व आम्हाला विकाव्या, आम्ही या बिया इतर देशातून विकत घेतो, त्या भारतातही स्वस्तात मिळतात, त्यामुळे आम्ही या बिया भारतातून घेण्यास तयार आहो, अशी बतावणी करून हे फसवणुकीचे प्रकरण घडल्याचे समोर आले. या व्यवहाराकरिता तळेगावच्या पदवीधर युवकाने त्याच्याकडील कार गहाण ठेवून तसचे वडिलांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रक्कमेतून ही रक्कम जुळवून खात्यात जमा केली. यातून सदर युवकाने खरेदी केलेल्या बिया घेण्यास कोणी आले नाही. या संदर्भात ज्या भ्रमणध्वनी क्रमांकाद्वारे या युवकासोबत संपर्क साधला होता तोही बंद मिळाला. काहीच उत्तर मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे या युवकाच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली. वर्र्ध्याच्या सायबर क्राईम विभागाने तपास करून तिघांना अटक केली.