शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासानंतरही निलंबनाच्या कारवाईला बगल

By admin | Updated: July 10, 2015 00:19 IST

रेती व्यावसायिक मृत्यूप्रकरण : तहसीलमध्ये पोलीस बंदोबस्त

आष्टी (श.) : गोदावरी येथील श्रीकृष्ण भुयार यांचा तलाठ्याच्या जाचामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणात तलाठ्याचे त्वरित निलंबन करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात पाच तास मृतदेह ठेवला. यावेळी ४८ तासांत कारवाई केली जाईल, असे एसडीओंनी सांगितले; पण त्यानंतरही कारवाई केली नाही. यामुळे मृतकाच्या भावाने अस्थिकलश एसडीओ कार्यालयात नेत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिल्याने वातावरण तापले.उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांनी ४८ तासांत निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता. आज ५८ तास संपले; पण कारवाई झाली नाही. कारवाई इतक्या लवकर होणार नाही, असे एसडीओ आंधळे यांनी सांगितले. आता या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. काँग्रेसच्या निलंबन मागणीवर भाजपाने तलाठी जगताप अत्यंत कर्तव्यदक्ष असून त्यांचे निलंबन त्वरित मागे घेण्याची मागणी केली. यामुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. अकिाऱ्यांनी स्वत: ग्रामस्थांना तक्रार देण्यास भाग पाडल्याची माहिती मृतक श्रीकृष्ण यांचा भाऊ नंदकिशोर भुयार यांनी दिली. अद्यापही कारवाई न झाल्याने मृतकाच्या भावाने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय आर्वी येथे अस्थिकलश घेऊन जात कारवाई होईस्तोवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. परिणामी, तहसील कार्यालयातच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. या प्रकारामुळे उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. यातच तलाठी जगताप यांना त्वरित निलंबित करावे, या मागणीसाठी युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव सचिन वैद्य जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची भेट घेणार आहे. त्वरित कारवाई न झाल्यास एसडीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून तणावाच्या भीतीनेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे प्रशासनाविरूद्ध वातावरण तापले आहे. उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांना विचारणा केली असता इतक्या लवकर कारवाई शक्य नाही. तहसीलदार यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करू असे सांगितले. या प्रकरणी राजकारण होत असल्याने संवेदनशील घटनेत हस्तक्षेप न करण्याचे आवाहन तहसीलदार मोरे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)