वर्धा : रोजची तीच धावपळ, तोच तणाव, कामाचा न संपणारा व्याप, वेळेचे नियोजन, सगळयांच्या चिंता करता करता येणारी अस्वस्थता, लवकरच होणारी दमछाक, वाढतं वय आणि त्याचे जाणवणारे परिणाम, शरीराकरिता आवश्यक व्यायामाचा अभाव, अळणी पथ्थे आणि खायला उठणारं आतलं रिकामपण या सगळ्यांमुळे सर्वकाही असूनही कधी कधी आपण आनंदी राहू शकत नाही. महिलाविषयक विविध सर्वेक्षणातून अशी समोर आली आहे. याकरिता सखी मंचने महिलांकरिता एक आगळेवेगळे चैतन्यमयी शिबिराचे आयोजन केले आहे. या तीन दिवसीय शिबिराला जुलै २२ प्रारंभ होईल. सदर शिबिर २४ जुलै पर्यंत असून शिबिराची वेळ दुपारी ४ ते ५.३० वाजेपर्यंत अशी वेळ राहणार आहे. सदर शिबिर वायगाव मार्गावरील सिंघानिया हॉल येथे घेतले जाणार आहे. या शिबिरातून सखींमध्ये नवचेतना आणण्यासाठी आहार-विहाराविषयी माहिती, योगा, प्राणायाम, ध्यान, हलका व्यायाम, प्रबोधनात्मक खेळ, सामाजिक दायित्वाची जाणीव करुन देणारे उपक्रम आयोजित आहे. या माध्यमातून महिलांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन घडविण्याच्या दृष्टीने शिबिर उपयुक्त असणार आहे.(उपक्रम प्रतिनिधी)
सखींकरिता सकारात्मकतेतून नवचैतन्य शिबिर
By admin | Updated: July 20, 2014 00:06 IST