शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नवजात चिमुकलीची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 22:02 IST

गांजा तस्करीच्या प्रकरणात अटक असलेली आरोपी गर्भवती होती. अटकेच्या कारवाईनंतर लगेचच तिची सोमवारी प्रसूती झाली. यात सदर चिमुकलीची प्रकृती गंभीर आहे.

ठळक मुद्देगांजा तस्करी प्रकरणातील महिलेची प्रसूती : बाळाला हलविले सेवाग्रामच्या रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांजा तस्करीच्या प्रकरणात अटक असलेली आरोपी गर्भवती होती. अटकेच्या कारवाईनंतर लगेचच तिची सोमवारी प्रसूती झाली. यात सदर चिमुकलीची प्रकृती गंभीर आहे. तिला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.आंध्र प्रदेशातून खरेदी केलेला गांजा अकोला येथे नेणाºया चव्हाण नामक दाम्पत्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रविवारी ताब्यात घेतले. यातील महिला गर्भवती असल्याने तिने जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलीला जन्म दिला. मात्र तिचे वजन कमी असून तिच्या तोंडातून रक्त येत आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी चव्हाण नामक दाम्पत्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा २० किलो गांजा जप्त केला. दक्षिण एक्सपे्रसने सेवाग्राम रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास करणाºया सदर दाम्पत्यासोबत आणखी काही जण होते. परंतु, या दोघांना ताब्यात घेल्याचे लक्षात येताच इतरांनी पळ काढला. तसेच ताब्यात घेतलेल्या चव्हाण नामक दाम्पत्यासोबत त्यांचा तीन वर्षीय मुलगा होता. यात अटक करण्यात आलेली महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. असे असताना तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती असे काही पोलीस कर्मचारी बोलत होते.सदर प्रकरण वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करताच रविवारी सायंकाळी आरोपी गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात सदर आरोपी महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु, नवजात मुलीचे वजन कमी असल्याने तसेच मुलीच्या तोंडातून रक्त येत असल्याने मुलीसह मुलीच्या आईला मंगळवारी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वर्धा लोहमार्ग पोलीस करीत आहेत.देखभालीकरिता पोलिसांची कसरतगांजा तस्करीत अटक केलेल्या महिलेची प्रसुती झाल्याने तिच्या देखभालीकरिता दोन कर्मचाºयांची नेमणूक केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.आरोपी असलेल्या महिलेने एका कमी वजनाच्या मुलीला जन्म दिला आहे. बाळाच्या तोंडातून रक्त येत असल्याने नवजात मुलीसह मुलीच्या आईला इतर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा.