शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवा विक्रम; एकाच दिवशी झाल्या तब्बल २२ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

शिबिरादरम्यान तब्बल २२ व्यक्तींची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झालेल्यांमध्ये सात वर्षाखालील तीन चिमुकल्यांचा समावेश असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी २२ यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हर्निया, हायड्रोसील, नाभी संबंधीचा हर्निया, जन्मजात हर्निया आणि फिमोसिसची लागण झालेल्या तब्बल २६हून अधिक गरजूंवर वेळीच शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश जुननकर यांना मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : असोसिएशन ऑफ सर्जन इंडिया, नागपूरच्या पुढाकारातून वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी विशेष शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरादरम्यान तब्बल २२ व्यक्तींची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झालेल्यांमध्ये सात वर्षाखालील तीन चिमुकल्यांचा समावेश असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी २२ यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ आहे.हर्निया, हायड्रोसील, नाभी संबंधीचा हर्निया, जन्मजात हर्निया आणि फिमोसिसची लागण झालेल्या तब्बल २६हून अधिक गरजूंवर वेळीच शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश जुननकर यांना मिळाली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखेडे व डॉ. प्रवीण धाकटे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. सामाजिक बांधिलकी जोपासत डॉ. जुननकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर शनिवारी प्रत्यक्ष हे विशेष शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरादरम्यान डॉ. नीलेश जुननकर यांच्यासह डॉ. घनश्याम चुडे, डॉ. बुटानी, डॉ. संदीप हटवार, डॉ. प्रसाद बन्सोड, डॉ. अमित पुजारी यांनी तब्बल २२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांना डॉ. विनोद कुरवले, डॉ. कपिल चव्हाण, डॉ. आशुतोष बाभुळकर यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

चार टेबलवरून झाल्या शस्त्रक्रिया-    शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी तब्बल २२ व्यक्तींवर यशस्वी शस्त्रक्रिया करून नवा विक्रम नोंदविण्यात आला. शनिवारी पार पडलेल्या या विशेष शस्त्रक्रिया शिबिरादरम्यान तब्बल चार टेबलवरून डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.-    जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शिबिरादरम्यान प्रसुती शस्त्रक्रिया प्रभावीत होऊ नये म्हणून एक शस्त्रक्रिया कक्ष राखीव ठेवण्यात आला होता. 

मी मूळचा वर्धा जिल्ह्यातील. वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा महिने इंटर्नशिप केली. त्यामुळे आजही मला हे रुग्णालय आपलेच वाटते. शिवाय शासकीय रुग्णालयांचे काही देणे बाकी आहे तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत मी व माझ्या सहकाऱ्यांनी गरजूंवर शस्त्रक्रिया करण्यासाठी होकार दर्शविला.- डॉ. नीलेश जुननकर,  अध्यक्ष, असोसिएशन ऑफ सर्जन इंडिया, नागपूर

विशेष शस्त्रक्रिया शिबिरादरम्यान शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २२ गरजूंवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एकाच दिवशी २२ व्यक्तींवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची ही जिल्हा रुग्णालयातील पहिलीच वेळ आहे.- डॉ. अनिल वानखेडे,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल