शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

मराठा-कुणबी बांधवांनी रचला नवा इतिहास

By admin | Updated: October 24, 2016 00:19 IST

मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाने रविवारी वर्धेत इतिहास घडविला. याचे साक्षीदार वर्धेकर ठरले

मूकमोर्चा : शिस्त अन् नि:शब्दाचा साक्षात्कार, महिलांच्या नेतृत्वाचा सन्मान वर्धा : मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाने रविवारी वर्धेत इतिहास घडविला. याचे साक्षीदार वर्धेकर ठरले. सकाळी ११ वाजतापासून मूकमोर्चास्थळी मराठा-कुणबी बांधवांचे आगमन सुरू झाले. प्रारंभी अत्यल्प प्रतिसाद वाटत असलेला मूकमोर्चा दुपारपर्यंत हजारोंच्या संख्येत परिवर्तीत झाला. जुने आरटीओ मैदानातून निघालेल्या या मूकमोर्चाची शिस्त अन् नि:शब्दाचा साक्षात्कार आणि महिलांच्या नेतृत्वाचा सन्मान वर्धेकरांनी खुल्या डोळ्यांनी अनुभवला. दुपारी १ वाजता शहिदांना आदरांजली अर्पण करून जुने आरटीओ मैदानातून हा मूकमोर्चा नियोजित मार्गाने निघाला. हा मोर्चा मैदनातून आर्वी नाक्याकडे वळला. यावेळी रस्त्याच्या दूतर्फा वृद्धांसह चिमुकलेही मूकमोर्चाच्या स्वागताकरिता आणि तो डोळ्यात साठविण्याकरिता रस्त्याच्या कडेला हातात ‘एक मराठा, लाख मराठा’ असे भगवे झेंडे घेवून उभे होते. तत्पूर्वी मैदानावर जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. जूने आरटओ मैदानात वैष्णवी डाफ आणि धनश्री देशमुख या दोन युवतींनी मूकमोर्चा मागील भूमिका आपल्या मनोगतातून विषद केली. यानंतर यवतमाळ येथील प्रा. प्रवीण देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मनोगतानंतर मूकमोर्चा आपल्या मार्गाने रवाना झाला. मैदानातील स्टेज समोरून राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व जिजाऊंच्या वेशभूषेत असलेल्या युवक-युवतींच्या मागे काळ्या रंगाचे वस्त्र व भगवे फेटे परिधान केलेल्या युवतीं, त्यांच्या मागे महिलांची गर्दी त्यांच्या मागे वकील मंडळी, डॉक्टर मंडळी आणि सहभागी मराठी-कुणबी बांधव अशी रचना असलेला हा मूकमोर्चा आपल्या नियोजित स्थळाकडे निघाला. पाच रस्त्यांचा चौक असलेल्या आर्वी नाक्यावर हा मूकमोर्चा पोहोचला असता मुख्य मार्ग सोडून इतर चारही बाजूने मूकमोर्चा डोळ्यात साठविण्याकरिता नागरिकांची तोबा गर्दी उसळली होती. मूकमोर्चाचे पुढचे टोक आर्वी नाक्यावर तर शेवटचे टोक मैदानातून होणे बाकीच होते. येथून हा मोर्चा शिवाजी चौकाकडे निघाला. आर्वी नाका ते शिवाजी चौक या मार्गावर रस्त्याच्या दूतर्फा नागरिकांची उपस्थिती मूकमोर्चाची भव्यता दर्शवित होती. शिवाजी चौकात मूकमोर्चा येण्यापूर्वीच नागरिकांची येथे गर्दी उसळली होती. मोर्चा शिवाजी चौकात पोहोचताच येथे दोन युवतींनी छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यानंतर मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने बजाज चौकाकडे निघाला. मुख्यमार्गावर भव्यमोर्चा पाहून अनेक अवाक् झाले. मूकमोर्चात सहभागी बांधवांकरिता कुण्या एका समाजाने नाही तर सर्वच समाजाच्या बांधवांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. यात विशेषत: मुस्लिम समाजातील नागरिकांचाही यात महत्त्वपूर्ण सहभाग बघायला मिळाला.