शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

न्यू इंग्लिश शाळेच्या शिक्षकांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: June 8, 2017 02:36 IST

वर्धा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेत कार्यरत १५ शिक्षकांना सेवेतून कमी करून

मागण्या निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेत कार्यरत १५ शिक्षकांना सेवेतून कमी करून नव्याने नियुक्तीचा घाट घालणाऱ्या संस्थेवर योग्य कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी अन्यायग्रस्त शिक्षकांनी बुधवार ७ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शिक्षकांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सदर निवेदनाची प्रत शिक्षणमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आली आहे. या संस्थेने सेवा शर्थीचा भंग केल्याने या प्रकरणाची चौकशी करून अन्यायग्रस्त शिक्षकांना सेवेत रूजू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेत (मराठी माध्यम) २००४ पासून १३ शिक्षिका व ३ शिक्षक कार्यरत होते. ही शाळा विना अनुदानित असून सर्व शिक्षकांचा दोन वर्षाचा प्रोबेशन कालावधी पूर्ण केला. त्यामुळे नियमानुसार सेवेत कायम झाले आहे;पण ३ ते १३ वर्षापासून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना अचानक कार्यमुक्त करून नव्याने शिक्षक भरती करण्याची जाहिरात संस्थेने प्रकाशित केली. ही घटना महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवा शर्ती अधिनियमांचा भंग करणारी असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. शासनाच्या प्रचलित नियमानुसार अनुदानास पात्र असताना संस्थाचालकांनी शासनाकडे त्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला नाही. कोणत्याही शिक्षकाला नियुक्तीचा आदेश व सेवापुस्तिका दिली नाही. वेतनवृद्धी, नियुक्ती आदेश, सेवापुस्तिका अनुदान प्रस्ताव व अनियमितता दूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालकाकडे मागील ३ वर्षापासून पाठपुरावा करून न्याय मिळाला नाही. नोकरीतून कमी करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. मराठी शाळा बंद करून सीबीएससी शाळा वाढविण्याचे संस्थेकडून सांगितले जात आहे. हा प्रकार बेकायदेशीर आहे. सेवेतून कमी केल्याने जगण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला सेवेत कायम ठेवावे, अशी मागणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी निवेदनातून केली आहे. धरणे आंदोलनात नंदा भटकर, सुनीता गळगटे, मनीषा दलाल, ममता उपसानी, मंगला इखार, स्वाती मोहतुरे, मनीषा नागपूरे, मनीषा लोणारकर, वैशाली महल्ले, वैद्य, प्रिया लामसोंगे, माधुरी टेकाम, हर्षल बुधोट, सूरज कोसूळकर आदी शिक्षक सहभागी झाले होते.