वर्धा :जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे गुरुवारी रूजू झाले. त्यांनी अनिल पारस्कर यांच्याकडून पदाभार स्वीकारला. तर वर्धेतून बीड येथे बदलून गेलेले जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात आलेल्या अनुभवाचे कथन केले. येथील एका हॉटेलात आयोजित कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक स्मीता नागणे पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तथा निरीक्षक व उपनिरीक्षक सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नव्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
नवे जिल्हा पोलीस अधीक्षक रूजू
By admin | Updated: May 22, 2015 02:18 IST