शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याने केली काकूची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:43 IST

येथील यशवंतनगरातील दीपा खियानी (३५) यांची त्यांचाच पुतण्या वीरेंद्र गोपीचंद खियानी (२४) याने हत्या केली. ही घटना मंगळवारी घडली असून आरोपीने दीपाला लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर दीपाचा मृत्यू झाला. मृत दीपा डेकोरेशन व्यावसायीक सुनील खियानी यांच्या पत्नी होत. या प्रकरणातील आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

ठळक मुद्देयशवंतनगरातील घटना : घरगुती वाद गेला विकोपाला

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील यशवंतनगरातील दीपा खियानी (३५) यांची त्यांचाच पुतण्या वीरेंद्र गोपीचंद खियानी (२४) याने हत्या केली. ही घटना मंगळवारी घडली असून आरोपीने दीपाला लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर दीपाचा मृत्यू झाला. मृत दीपा डेकोरेशन व्यावसायीक सुनील खियानी यांच्या पत्नी होत. या प्रकरणातील आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.पोलीस सूत्रानुसार, दुपारी १२ वाजताच्या सुमारास दीपा हिचा पती सुनील खियानी हे संत कंवरराम सभागृहात कामानिमित्त गेले होते. त्यांना पुतण्या सचिनने काकुला मार लागला असून त्या पडल्याची माहिती दिली. त्यानंतर ते तातडीने घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना पत्नी दीपा ही रक्ताचे थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. त्यानंतर दीपाला कुटुंबीयांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपाला मृत घोषित केले. मृत दीपा आणि आरोपी वीरेंद्र यांच्यात घरातील रस्त्याच्या कारणावरून वाद झाला. शिवाय तो वाद विकोपाला जाऊन शाब्दिक चकमकीचे हाणामारीत रुपांतरण झाले. यातच वीरेंद्र याने दीपा हिला लोखंडी रॉडने मारहाण करून तिला गतप्राण केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सत्यवीर बंडीवार आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळवरून काही नमूने आणि साहित्य जप्त घेतले आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सूरू होती. पुढील तपास पीएसआय जीतेश कानपूरे करीत आहे.एक मजली इमारतीत तीन भावांचे वास्तव्ययशवंतनगरातील एक मजली इमारतीत खियानी कुटुंबातील तीन भावांचा परिवार वास्तव्याला आहे. तळ मजल्यात गोविंद खियानी तर पहिल्या मजल्यावर सुनील खियानी आणि गोपीचंद खियानी यांचे कुटुंब राहते. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांना एकच रस्ता आहे. याच घरातील रस्त्याच्या कारणावरून नेहमी खटके उडत होते. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वी दीपा हिने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते; पण त्यानंतर तिला समज देत परत आणण्यात आले. मात्र, आज हा वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे वास्तव असल्याची चर्चा परिसरात होत होती.दीपा मुलींना नुकतीच शाळेत पोहोचवून आली होतीमृत दीपा हिला दोन मुली आहेत. लहान मुलगी सहावीत तर मोठी आठवीचे शिक्षण घेत आहे. सदर घटनेच्या काही मिनिटांपूर्वी दीपा ही दोन्ही मुलींना शाळेत पोहोचून आली होती. शिवाय, घटनेच्या वेळी ती घरी एकटी होती, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.