शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची जगाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:06 IST

गौतम बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे.

ठळक मुद्देसामाजिक न्यायमंत्री : बोरधरण आणि केळझर येथील ५ कोटींची पर्यटन विकास कामे

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : गौतम बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे. जागतिक दहशतवादाच्या, आक्रमतेच्या, निराशेच्या आणि अनिश्चिततेच्या वातावरणात गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.यावेळी पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पंचायत समितीच्या सभापती सुनिता खोडे, भन्ते सदानंद, सियाराम लोहकरे, सरपंच रेखा लोंढे, उपसरपंच फारुख शेख उपस्थित होते.बोरधरण येथील बगीचा, केळझर येथील गणेश मंदिर परिसराचा विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचा विकास, हजरत पीरबाबा टेकडी परिसर विकास अशा एकूण ५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार आणि राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ज्यामुळे माणसाला माणसासारखे वागवले जाते. पण त्याहीपेक्षा त्यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा धम्माची ओळख समाजाला करून दिली. शोषित वर्गाचे हित साधल्याशिवाय देशाची उन्नती साधली जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.७० वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानावर संसदेत चर्चा घडवून आणली हे सांगताना खा. रामदास तडस म्हणाले, बाबासाहेबांचा विचार आज घरा-घरापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. पहिल्यांदा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येतोय. त्यात पुन्हा पर्यटन विकास कामांची भर पडली आहे.केळझरला तिनही धर्माचे उत्कृष्ट आणि नावाजलेले धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे केळझरला अ वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळावा अशी मागणी आमदार पंकज भोयर यांनी प्रसंगी केली. आमदार कुणावार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.सांस्कृतिक ठेवा जपण्याची आवश्यकता - मदन येरावारआजच्या पिढीसमोर गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देण्याची गरज आहे. केळझरच्या भूमीवरून गत ४० वर्षांपासून धम्म परिषद आयोजित करून हा संदेश पोहचविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे या परिसराचा विकास करण्यासाठी आणखी निधी देऊ असे मदन येरावार म्हणाले. आज संपूर्ण जगात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा शांतीचा संदेश देणाºया बुद्धाची आठवण होते. युद्ध नको बुद्ध हवा, असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही. आपल्या पुर्वजांनी संस्कृतीचा ठेवा पुस्तक रूपात जतन केला आहे. त्यामुळे या पुस्तकांसाठी सुसज्ज ग्रंथालय याच कामात निर्माण करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच या सर्व विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे आमदार पंकज भोयर यांचे कौतुकही केले.