शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रश्नांवर एकत्र येऊन कार्य करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:48 IST

शेतकरी संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील जनता व शेतकºयांच्या समस्या जाणुन घेतल्या. चर्चा व संवादातून अडीअडचणी कशा सोडविता येईल. ग्रामीण भागाचे शोषण कसे थांबविता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअभिजीत फाळके : कृषी संवाद यात्रेचा सेवाग्राम आश्रमात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शेतकरी संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील जनता व शेतकºयांच्या समस्या जाणुन घेतल्या. चर्चा व संवादातून अडीअडचणी कशा सोडविता येईल. ग्रामीण भागाचे शोषण कसे थांबविता येईल या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आमदार, खासदारांच्या पगारवाढीचा प्रश्न सुटतो पण शेतमालाच्या भाववाढीसाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून कृषी प्रश्नांवर कार्य करण्याची गरज आहे, असे मत भुमीपूत्र संघर्ष वाहिनीचे संस्थापक अभिजीत फाळके यांनी व्यक्त केले.सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम येथे शेतकरी संवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संतोष अडसूड, प्रदीप बिन्नोळे, प्रदीप घोडे, प्रा. अरुण फाळके, मनोज भांगे उपस्थित होते. उपस्थितांनी समायोचित मार्गदर्शन केले. यानंतर शेतकºयांच्या समस्यांबाबत अभिजीत फाळके यांनी निवेदन स्विकारली. ९ सप्टेंबर ला सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथून यात्रेला प्रारंभ करण्यात आला होता.आपुलकी सामाजिक संस्था पुणे, संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, अनिल गावंडे मित्र मंडळ, टिच वन, किसान पुत्र आंदोलन, मातृतिर्थ फाउंडेशन, सिंदखडेराजा व भूमीपूत्र संघर्ष वाहिनी या सामाजिक संघटनांच्या सहभागाने संवाद यात्रा काढण्यात आली होती.प्रशांत देशमुख, सचिन घोडे, स्वप्नील देशमुख, रमेश घोगरे, योगेश घोगरे, अतुल पाळेकर, प्रवीण काटकर, प्रवीण उगेमुगे, अरुण काटकर, सागर बुराडे, गौरव देशमुख, मनोज चांदुरकर आदींनी सहकार्य केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.