शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समग्र विकासासाठी समाजवादी विचारांची गरज

By admin | Updated: July 25, 2015 02:21 IST

विविध जाती, धर्म, वर्ण पंथाचे स्थान असलेल्या भारत देशात विविध भौगोलिक व पर्यावरणीय स्थिती आहेत.

वर्धा : विविध जाती, धर्म, वर्ण पंथाचे स्थान असलेल्या भारत देशात विविध भौगोलिक व पर्यावरणीय स्थिती आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक समग्र विकासाच्या समाजवादी विचारांची वाढ झाल्याशिवाय देशाचा समग्र विकास होणार नाही, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी व्यक्ता केले किसान अधिकार अभियानच्या वतीने आयोजित बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार तर अतिथी म्हणून मुख्य प्रेरक अरविंद काकडे, उपस्थित होते. मार्गदर्शन करताना सुराणा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर राष्ट्र निर्माणाचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. देशात गरिबी, अस्पृश्यता, जातीयता, धर्मांधता, अशिक्षितपणा, जमीनदारी प्रथा मोठ्या प्रमाणात होत्या. प्रत्येकाच्या हाताला काम, सर्वांना शिक्षण, जमिनीचे समान वाटप, शेती व उद्योगांचा विकास, सिंचन प्रकल्पांची निर्मिती हे आव्हान तत्कालीन प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात देशाने स्वीकारले होते. जवाहरलाल नेहरूचे भारताच्या निर्मितीसाठी असलेले योगदान आपण विसरू शकत नाही. शेतीच्या विकासासोबतच उद्योगांच्या विकासाला चालना देणे त्यावेळी आवश्यक होते.ग्राम विकासासाठी सिंचन प्रकल्पांचा विकास, शेतीसाठी कर्जाची उपलब्धता व सामाजिक विकासाचे पंचवार्षिक नियोजन नेहरू यांनी केले. जमीनदारी नष्ट करण्यासाठी घटनेत कलम नऊमध्ये तरतूदही त्यांनी करवून घेतली.पुढील काळात आपल्याला निवडणूक सुधारणा, प्रमाणशीर, प्रतिनिधित्व, समग्र विकासाचे धोरण, सामाजिक समता, जागतिकीकरणाला विरोध व सामाजिक सहकारी तत्वांच्या विकासाच्या आधारे योजना व धोरण आखूनच देशाचा विकास करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. काकडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. ते म्हणाले, शेतकरी व असंघटीत क्षेत्रातील नागरिकांवर वाढत असलेले अन्याय व शोषण भीषण आहे. धर्मनिरपेक्ष विचारांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असून न्याय व्यवस्था वेशीला टांगून धर्माध, भ्रष्टाचार, गुंडागर्दी, चोऱ्या व बलात्कार करणाऱ्यांना सध्या वाव मिळत आहे. शासन व्यवस्था अन्याचाच्या बाजूने झुकलेली आहे. अशावेळी मोठ्या प्रमाणात सामाजिक चेतना जागविण्याची व लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी संघर्षाची गरज असल्याचे ते म्हणाले. पवार यांनीही हक्कासाठी संघर्ष करणाची गरज व्यक्त केली. शेतकरी वर्गाची स्थिती सध्या खूप नाजूक आहे. शासनाकडून शेतमालाला भाव न मिळणे व निसर्गाचा बेभरवशीपणा यामुळे शेतकरी हिताची भूमिका शासनाने घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीत जगदीश चरडे, बाबाराव ठाकरे, मंदा ठाकरे, किरण राऊत, मंगेश शेंडे, ज्ञानेश्वर ढगे, पांडूरंग डहाके, भाऊराव काकडे, विनायक तेलरांधे, गोविंदा पेटकर, प्रमोद नरसेकर, दुर्गाप्रसाद मेहेरे, सुनील सावध, किशोर जगताप, राजेश्वर ताजणे, मयुर राऊत, अमर काकडे उपस्थिती होते.(शहर प्रतिनिधी)