शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगारासाठी अंगी कौशल्य गुण गरजेचा

By admin | Updated: February 7, 2017 01:07 IST

केवळ पदवी प्राप्त करून रोजगाराच्या संधी मिळत नाही. यासाठी स्वत:मध्ये कौशल्य गुण आवश्यक आहे. ज्यांच्यात कौशल्य गुण आहे.

शैलेश नवाल : वर्धेत रोजगार मेळावावर्धा : केवळ पदवी प्राप्त करून रोजगाराच्या संधी मिळत नाही. यासाठी स्वत:मध्ये कौशल्य गुण आवश्यक आहे. ज्यांच्यात कौशल्य गुण आहे. त्यांना रोजगाराची संधी हमखास उपलब्ध होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.स्थानिक विकास भवन येथे दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नगर परिषद आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प.उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, सभापती शबाना परविन, श्रेया देशमुख, नागपूरचे कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनील काळबांडे, न. प. च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, जिल्हा अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक वामन कोहाड, अशोक गवई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शैलेश नवाल पुढे म्हणाले, दुसऱ्याची तुलना न करता मनुष्याने जीवनामध्ये ‘मला काय करायचे आहे’ हे ध्येय ठेवून काम केल्यास यश प्राप्त होऊन नावलौकिक होण्यास मदत होईल. शेती तंत्र यासारखे नवनवीन कौशल्य आत्मसात करावे. असे झाल्यास शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय करण्यास मदत होऊन आर्थिक लाभ प्राप्त करता येईल, असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी देशात ६५ टक्के तरुण असून या त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाचा केवळ लाभ न घेता प्रशिक्षितांनी स्वत:चा उद्योग उभारावा यासाठी बॅँकेमार्फत मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले. मार्गदर्शन करताना वामन कोहाड यांनी मुद्रा बॅँक योजना व कॅशलेस व्यवहार या विषयी मार्गदर्शन केले.